Friday, May 24, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांचं टेन्शन वाढणार? अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन हस्तक्षेप याचिका...

शरद पवारांचं टेन्शन वाढणार? अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन हस्तक्षेप याचिका दाखल

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात पक्ष आणि निवडणूक चिन्हासाठी संघर्ष सुरू आहे. याप्रकरणाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू आहे. यादरम्यान आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष दिरंगई करत असल्याने या प्रकरणात हस्तक्षेप करावा यासाठी ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या या याचिकेवरील सुनावणी एकत्रितपणे होणार आहे. यादरम्यान या सुनावणीआधीच अजित पवार गटाने मोठी खेळी खेळली आहे. अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. नरहरी झिरवळ, छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अजित पवार गटाचे दाखल केलेल्या या तीन हस्तक्षेप याचिका कोर्टाने स्वीकारल्या, तर त्यांच्या वतीने 3 वकील बाजू मांडणार आहेत. त्यामुळे न्यायालय या प्रकरणात का निर्णय देतं याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

शरद पवार गटाने आपल्या याचिकेत काय म्हटलंय?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना वारंवार पत्राद्वारे विनंती करूनही आमदारांच्या अपात्रतेवर वेळकाढूपण केला जात असल्याचा मुद्दा शरद पवार (Sharad Pawar) गटाने कोर्टासमोर मांडला आहे. हाच मुद्दा ठाकरे गटाने सुद्धा मांडला असून आज या दोन्ही प्रकरणावर एकत्रित सुनावणी होणार आहे. शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. तर शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांची याचिका आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या