Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्रAccident News : भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक; सख्ख्या बहीण-भावासह तिघांचा मृत्यू

Accident News : भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक; सख्ख्या बहीण-भावासह तिघांचा मृत्यू

सातारा | Satara

येथील पुणे-बंगळुरू (Pune-Bangalore Highway) महामार्गवर कराड (Karad) तालुक्यातील पाचवड फाटा (Pachwad Phata) येथे वॅगनर कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून मृतांमध्ये बहीण भावासह भाच्याचा समावेश आहे….

- Advertisement -

Chhagan Bhujbal : “मला मोठं केलं ते…”; छगन भुजबळांचे जरांगे पाटलांना प्रत्युत्तर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत तिघे हे आपल्या वॅगनर कारने (Wagner Car) मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघाले होते. यावेळी भरधाव वेगात असणारी त्यांची कार कराडजवळील पाचवड फाटा परिसरात आली असता समोर उभ्या असलेल्या ट्रकवर (Truck) जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात वॅगनर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Manoj Jarange Patil Sabha : मनोज जरांगे पाटलांनी सरकारपुढे ठेवल्या ‘या’ मागण्या

अभिषेक जाधव,भारती जाधव आणि नितीन पोवार अशी मृतांची नावे असून यामध्ये अभिषेक आणि भारती जाधव हे दोघे भाऊ-बहीण होते. तर अभिषेक जाधव हे कोल्हापूर (Kolhapur) पोलीस दलातील कर्मचारी आहेत. बहिणीसोबत ते मुंबईला निघाले होते. त्याचवेळी बहीण भावावर काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनेमुळे जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून कोल्हापूर पोलीस दलात सहकारी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Cabinet Expansion : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? शिंदे-फडणवीसांमध्ये तब्बल अडीच तास खलबतं

दरम्यान, पुढे असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने मागून आलेल्या वॅगनर कारने ट्रकला धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात (A Terrible Accident) घडल्याचे सांगितले जात आहे. तसेच या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर ती सुरळीत करण्यात आली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या