Friday, February 6, 2026
Homeक्राईमहृदयद्रावक : मजुरांवर झोपेतच काळाचा घाला ; अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले

हृदयद्रावक : मजुरांवर झोपेतच काळाचा घाला ; अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले

जळगाव – jalgaon
जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला सर्व्हीस रोडच्या कामाच्या ठिकाणी रात्री झोपलेल्या तीन परप्रांतीयांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि.11 मार्च रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरापासून जळगाव खुर्द हे गाव अगदी 8 किलोमीटर अंतरावर आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग गेला असून आता नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू असून या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे काम देखील सुरू आहे. याच पुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडचे देखील काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतूकीसाठी बंद होता.

- Advertisement -

याच रोडच्या आणि पुलाच्या कामाच्या ठिकाणी परप्रांतीय मजूर कामाला आहेत. दरम्यान, मंगळवारी 11 मार्च रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास सिकंदर नाटूसिंग राजपूत, भुपींदर मिथीलाल राजपूत आणि योगेश कुमार राजबहाद्दूर तिघे राहणार उत्तर प्रदेश हे सर्व्हिस रोडवर बांधकामाचे साहित्य व पट्टी टाकून झोपलेले होते. तिघेजण गाढ झोपेत असतांना अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले. ही घटना सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीला आली. त्यानुसार नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

AMC : दुसर्‍या दिवशीही अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मध्य शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अहिल्यानगर महापालिकेने सलग दुसर्‍या दिवशीही जोरदार अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. बुधवारी (4 फेब्रुवारी)...