Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन सभा

मुंबईत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन सभा

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, गुरुवारी राज्याच्या दौऱ्यावर येत असून ते दिवसभरात तीन सभा घेणार आहे पंतप्रधान मोदींची उद्याच्या दौऱ्यातील शेवटची शिवाजी पार्कच्या मैदानावर होणार आहे. यावेळी महायुतीचे नेते आणि उमेदवार उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या सभेच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शनची तयारी केली आहे. मोदींच्या सभेच्या माध्यमातून मुंबईत वातावरण निर्मिती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता १८ नोव्हेंबरला होणार असून प्रचारासाठी जेमतेम पाच दिवस उरले आहेत. त्यामुळे भाजपने आपल्या शीर्षस्थ नेत्यांच्या निवडणूक सभांचा सपाटा लावला आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी गुरुवारी दिवसभरत तीन सभा घेणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा उद्या दुपारी एक वाजता छत्रपती संभाजीनगर येथे होईल. त्यानंतर नवी मुंबईतील सेंट्रल पार्क खारघर येथे दुपारी चार वाजता मोदींची दुसरी सभा पार पडेल. नवी मुंबईची सभा आटोपून मोदी संध्याकाळी सहा वाजता दादर, शिवाजी पार्क येथे आयोजित सभेला संबोधित करतील.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...