Saturday, May 25, 2024
Homeमुख्य बातम्यासमृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) सुरु झाल्यापासून अनेक अपघात (Accident) घडले असून अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर ट्रक आणि कारचा (Trucks and Cars) भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे…

- Advertisement -

धक्कादायक : शेजारी राहणार्‍या मित्राने झाडल्या 16 वर्षीय मुलीवर गोळ्या!

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर लासुर स्टेशन (Lasur Station) येथे हडस पिंपळगाव जवळ शिर्डीहून नागपूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. यामध्ये पती-पत्नी आणि एक लहान मुलगा जागीच ठार झाला तर दोन मुले जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. तर हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

धुलिवंदनच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील इंधनाचे भाव

दरम्यान, या अपघातामध्ये अनिल राठोड आणि भाग्यश्री राठोड या दांपत्यासह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातामध्ये संपूर्ण कुटुंब संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या