Tuesday, June 17, 2025
Homeजळगावनव्या सरकारमध्ये जिल्ह्याला तीन मंत्रिपदे शक्य!

नव्या सरकारमध्ये जिल्ह्याला तीन मंत्रिपदे शक्य!

हेमंत अलोने

जळगाव । Jalgaon

- Advertisement -

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने आघाडी सरकार कोसळले. येत्या 24 ते 48 तासात भाजपा (BJP) आणि शिंदे गटाचे नवे सरकार राज्यात अस्तित्वात येणार आहे. नव्या सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याला किमान तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आघाडी सरकार कोसळले असले तरी शिंदे गटाच्या भवितव्याबाबत काही प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. शिवसेना विधिमंडळ पक्ष आणि शिवसेना पक्षात निर्माण झालेला दुरावा सांधला जाईल का हा प्रश्नच आहे. राजकीय कसब पणाला लावून शिंदे गट आमदारकी निश्चित वाचवू शकेल, मात्र मूळ शिवसेना आणि शिवसेना विधिमंडळ पक्ष यातील भली मोठी दरी मिटण्याची तुर्तास तरी शक्यता दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडात जळगाव जिल्ह्यातून शिवसेनेचे सर्व चारही आमदार आणि एक अपक्ष असे पाच जण सामील होते. सामान्य शिवसैनिक आणि बर्‍याचशा पदाधिकार्‍यांना या आमदारांची भूमिका फारशी रुचली नव्हती. मात्र आता मतदारसंघात परतल्यानंतर शिवसैनिक या आमदारांचे कसे स्वागत करतात याची उत्सुकता आहे.

आघाडी सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याला गुलाबराव पाटील यांच्या रूपाने एकमेव कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. नव्या मंत्रिमंडळात जिल्ह्याच्या वाट्याला तीन मंत्रीपदे येऊ शकतात. भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे आ.गिरीश महाजन यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश निश्चित आहे. त्यांना कोणते खाते मिळणार याचीच उत्सुकता आहे. आ.गुलाबराव पाटील यांना देखील पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद मिळेल याबाबत राजकीय निरीक्षकांमध्ये दुमत नाही.

शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील हे देखील मंत्रीपदाचे दावेदार आहेत, मात्र एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातून एकाच जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्रिपदे देण्यात येतील का याबाबत साशंकता आहे. आ.चिमणराव पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते, मात्र आपली ज्येष्ठता पाहता ते राज्यमंत्रीपदासाठी राजी होतील का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. चोपड्याच्या आमदार सौ.लताताई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले गेले होते, मात्र आता त्यांना सहज दिलासा मिळू शकतो असे जाणकारांना वाटते. पाचोर्‍याचे आ.किशोर आप्पा पाटील व मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यापैकी एकाचा महामंडळासाठी विचार केला जाऊ शकतो.

सरकार पातळीवर जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असली तरी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी एकनाथराव खडसे यांचा विचार केला जाण्याची आशा राष्ट्रवादीतील खडसे समर्थकांना वाटत आहे. भाजप सरकारला जेरीस आणण्यासाठी खडसेंच्या आक्रमकतेचा राष्ट्रवादी उपयोग करून घेऊ शकते असे खडसे समर्थकांना वाटते. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दहा आमदार आहेत, त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी या दोन्ही पक्षात स्पर्धा होऊ शकते. याबाबत येत्या काही दिवसातच चित्र स्पष्ट होईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : “कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी…”; राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर शरद...

0
मुंबई | Mumbai राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. तसेच राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे...