Saturday, May 3, 2025
Homeनाशिकराज्याचे तीन मंत्री उद्यापासून इटलीच्या दौऱ्यावर

राज्याचे तीन मंत्री उद्यापासून इटलीच्या दौऱ्यावर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

इटलीत आयोजित करण्यात आलेल्या ‘मॅकफ्रूट’ प्रदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह तीन मंत्री उद्या रविवारी इटलीच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

- Advertisement -

इटलीतील रोमिनी येथे ‘मॅकफ्रूट -२०२५’ हे जगातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीपाला प्रदर्शन ६ ते ८ मे या काळात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला माणिकराव कोकाटे यांच्यासह पणनमंत्री जयकुमार रावल आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे भेट देणार आहेत. या तिन्ही मंत्र्यांचा दौरा ४ ते ९ मे असा आहे.

इटलीच्या दौऱ्याचा खर्च बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी असलेल्या आर्थिक तरतुदीतून भागवण्यात येणार आहे.

या दौऱ्यात भारतीय दुतावास, इटलीतील चेंबर आँफ काँमर्स, आयातदार आणि वितरकांच्या प्रतिनिधींसोबत व्यावसायिक बैठका होणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

माघार घेता घेता…काका झाले आमदार

0
श्रीराम जोशी| 9822511133 पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस मला आजही आठवतो....2009मधील विधान परिषदेच्या नगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील उमेदवारी माघारीचा तो शेवटचा दिवस होता... काँग्रेसकडून...