Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईतील लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

मुंबईतील लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

मुंबई | Mumbai

मुंबईतील लोखंडवाला येथील रिया पॅलेसमध्ये आज सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार लेव्हल एकची आग असून या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

या आगीमध्ये चंद्रकांत सोनी (वय ७६) कांता सोनी (वय ७१) आणि नोकर रवी (वय ३३) असे होरपळून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तसेच या आगीचा माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाडा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना तब्बल एका तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

YouTube video player

दरम्यान, सदर इमारत १४ मजली असून या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जखमी झालेल्या लोकांना जवळच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच ओशिवरा पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Crime News : धक्कादायक! काका व चुलत भावाकडून तरुणाची हत्या

0
सोनई |वार्ताहर| Sonai सोनई-कांगोणी रस्त्यावरील वडघुले वस्ती येथे मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी रात्री जुन्या घरी आल्याच्या कारणावरून चुलता व चुलत भावांनी भावाची हत्या केल्याची घटना...