Sunday, November 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईतील लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

मुंबईतील लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

मुंबई | Mumbai

मुंबईतील लोखंडवाला येथील रिया पॅलेसमध्ये आज सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार लेव्हल एकची आग असून या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

या आगीमध्ये चंद्रकांत सोनी (वय ७६) कांता सोनी (वय ७१) आणि नोकर रवी (वय ३३) असे होरपळून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तसेच या आगीचा माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाडा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना तब्बल एका तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

दरम्यान, सदर इमारत १४ मजली असून या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जखमी झालेल्या लोकांना जवळच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच ओशिवरा पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : गुंडांची मजल अत्यावश्यक सेवेपर्यंत! ​उपनगरला हप्त्यासाठी वितरकाला...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upnagar Police Station) हद्दीतील झोपडपट्टी परिसरात स्थानिक टवाळखोर आणि मद्यपींच्या टोळक्यांनी आता आपला मोर्चा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या...