Wednesday, March 26, 2025
HomeनाशिकNashik Accident News : नाशिकरोडला वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

Nashik Accident News : नाशिकरोडला वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

नाशिकरोड परिसरात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात (Accident) तीन जण ठार झाले असून त्यामध्ये एका परिचारिकेचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

येथील बिटको चौकात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री साधारण आठ वाजेच्या सुमारास दुचाकी चालक गुलाम मुस्तफा शहा हे आपली दुचाकी गाडी क्रमांक एम एच 15 इ डब्ल्यू 89 16 या गाडीवरून जात होते. त्यांना छोटा हत्ती गाडी क्रमांक एम एच 04 इ बी 1268 यांची टोस बसल्याने गुलाम शहा हे जागीच ठार झाले.

अपघातानंतर उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान ही घटना समजताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अपघाताचे नोंद करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे दुसऱ्या एका अपघातात नाशिक महापालिकेच्या दसक येथील रुग्णालयात परिचारिकेचे काम करणाऱ्या प्रिया चंद्रपाल पवार (34, रा. पाथर्डी गाव, उमेश नगर) या कामासाठी घरून पाथर्डी गाव येथून रीक्षा क्रमांक एम एच 15 ए के 59 75 या रिक्षाने विहित गावकडे येत असताना सदरची रिक्षा वडनेर गावाजवळ येताच उलटली.

त्यानंतर रिक्षात बसलेल्या प्रिया पवार उर्फ जाधव या रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला तर रिक्षा चालक संजय पगारे हे सुद्धा अपघातात जखमी झाले. अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली त्यानंतर माजी नगरसेवक जगदीश पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी प्रिया पवार यांना उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघातात ठार झालेल्या प्रिया पवार उर्फ जाधव या महापालिकेच्या दसक येथील रुग्णालयात पारिचारिका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, सासरे असा परिवार आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

तिसऱ्या अपघातात सुभाष रोड येथे रस्त्याने पायी जाणारे किशोर गणपत शिंदे (65) यांना मोपेड गाडी क्रमांक एम एच 15 ए झेड या गाडीची जोरदार ठोस बसल्याने ते जबरदस्त जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस नाईक आशिष गायकवाड यांनी तक्रार दाखल केली असून मोपेड दुचाकी गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगताप हे करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Kopargav : गोदापात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav शहरातील गजानन नगर परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात (Godavari River) एका अज्ञात पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने परिसरात खळबळ...