Monday, November 16, 2026
HomeनाशिकNashik News : जिल्ह्यातून परराज्यात कामासाठी गेलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू

Nashik News : जिल्ह्यातून परराज्यात कामासाठी गेलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू

सटाणा | प्रतिनिधी | Satana

गुजरात (Gujarat) राज्यातील बारडोली शहराजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मालट्रकचा झालेल्या भीषण अपघातात (Terrible accident) बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) खमताणे येथील तीन जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून पाच जण जखमी आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती आशिक की, डाळिंब छाटणी करण्यासाठी बागलाण तालुक्यातील खमताणे (Khamtane) परिसरातील छाटणी कामगार विरगाव येथील भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रकवर सुरत येथे निघाले होते. बारडोली जवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात पिंटू पिराजी पवार (वय ४०, रा. खमताणे), सोनू एकनाथ मोरे (वय ३५, रा.खमताणे), भाऊसाहेब प्रताप बागुल (वय ५०, रा. खमताणे) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बाबाजी कडू पवार, भाऊसाहेब हिरामण पवार, आकाश माळी, तुळशीराम सोनवणे (रा. तळवाडे), दादा केरसानेकर आदी गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरत (Surat) येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या भीषण अपघाताची (Accident) माहिती घटनास्थळावर उपस्थित असलेल्या बागलाणमधील एका ट्रक चालकाने आमदार दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) यांना देत मदतीची मागणी केली. त्यानंतर आमदार बोरसे यांनी तात्काळ बारडोली भाजप आमदार ईश्वरभाई परमार (MLA Ishwarbhai Parmar) यांच्याशी संपर्क साधून बागलाण तालुक्यातील अपघातग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली. यानंतर आमदार परमार यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून जखमींना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर जखमींवर वेळीच उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 2006 च्या दिव्यांग भरतीतील 70 शिक्षकांची मूळ फाईलच गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 2006 मधील विशेष दिव्यांग शिक्षक भरतीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या भरतीशी संबंधित 70 शिक्षकांच्या मूळ...