Monday, March 31, 2025
Homeनंदुरबारशहादा येथे तिघांना बेदम मारहाण ; 11 जणांविरुद्ध गुन्हा

शहादा येथे तिघांना बेदम मारहाण ; 11 जणांविरुद्ध गुन्हा

शहादा । ता.प्र. nandurbar

अपमानकारक शब्द बोलू नका असे सांगितल्याचा राग येऊन तिघांना बेदम मारहाण झाल्याची घटना शहरातील गांधी उद्याननजीक घडली. याप्रकरणी 11 जणांविरोधात कलम 307 व दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रईसखान मुक्तारखान बागवान याचा भाऊ इद्रिस बागवान हा शहरातील गांधी उद्यानजवळील रस्त्याने जात असताना आठ ते दहा जणांनी थांबून अपमानकारक शब्द वापरले. त्यामुळे इद्रिस याने असे बोलू नका असे सांगितल्याचा राग येऊन शुभम जवेरी, जगदीश बोरदेकर, विकी तांबोळी, चेतन चौधरी, गुड्डू पवार, महेश पाटील, भूपेंद्र चौधरी, पंकज चौधरी, जग्गू न्हावी, राजू भोई व पिरी (पूर्ण नाव माहित नाही) यांनी इद्रिस बागवान, रईस बागवान व अक्तर बागवान या तिघांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीत तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना गावात पसरतात शहरात तणाव निर्माण झाला असून रईसखान मुक्ताखान बागवान यांच्या फिर्यादीवरून वरील तीनही संशयितांविरोधात कलम 307 व कलम 341, 143, 147, 148, 149 प्रमाणे दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत. यातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित संशयितांचा शोध घेत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi News : शिर्डी विमानतळावरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडीगची गुढी

0
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन रविवारी 30 मार्चपासून नाईट लँडीग सुरू झाली असून हैदराबादवरुन इंडीगो एअरलाईनचे विमान 56...