Monday, November 25, 2024
Homeधुळेजिल्ह्यात विविध अपघातात तीन जण ठार

जिल्ह्यात विविध अपघातात तीन जण ठार

धुळे । dhule। प्रतिनिधी

जिल्ह्यात बुधवार हा घात वार ठरला. वेगवेगळ्या अपघातात (various accidents) तीन जण (Three people) ठार (killed)तर एक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत त्या-त्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

साक्री तालुक्यातील जामुनपाडा ते रोहोड दरम्यान भरधाव दुचाकी नाल्यात कोसळून दुचाकीस्वार ठार झाला. तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. चिंतामण राजमल साबळे (वय 40 रा. जामुनपाडा पो.रोहोड ता.साक्री) असे मयताचे नाव आहे. तो दि.12 रोजी दुपारी त्यांच्या दुचाकीवर (क्र. एमएच 39 टी 3923) भरत चुनिलाल कामडे (वय 22 रा. चिंचपाडा) यास मागे बसवून जामुनपाडा ते रोहोड रस्त्याने भरधाव वेगाने जात होता. त्यादरम्यान रेट्या नाल्याजवळ त्याचे नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी थेट नाल्यात कोसळली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चिंतामण साबळे हा ठार झाला. तर भरत कामडे हा देखील डोक्याला मार बसून गंभीर जखमी झाला. दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याबाबत उत्तम राजमल साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना डी.के. कोळी करीत आहेत.

ट्रॅक्टरच्या धडकेत पादचारी ठार

शिंदखेडा ते दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल बुधबन नजीक भरधाव ट्रॅक्टरने मागावून पादचार्‍यास जबर धडक दिली. त्यात पादचारी दंगल किसन पवार (वय 42 रा. अहिल्यानगर ता. शिरपूर) हे ठार झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झाला. भिसन भगवान पवार (रा. अहिल्यानगर) याच्या तक्रारीनुसार, अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक हरपालसिंग छगनसिंग जमादार (रा. अराळे ता. नंदुरबार) याच्याविरोधात शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय ठाकरे करीत आहेत.

रिक्षाच्या धडकेत मॉनिर्ंग वॉक करणारी व्यक्ती ठार

धुळे शहरातील देवपूर भागातील बडगुजर पेट्रोलपंपासमोर रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेत पादचारी व्यक्ती ठार झाला. प्रदीप भाऊसिंग राजपुत (वय 43 रा. नगावबारी, धुळे) असे मयताचे नाव आहे. ते बुधवारी पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास राजेंद्र प्रभाकर पवार (वय 23 रा. विद्यानगरी, देवपूर) याच्यासह मॉर्निंग वॉक करीत होते. त्यादरम्यान प्रदीप राजपुत यांना मागून भरधाव वेगाने येणार्‍या रिक्षाने (क्र. एमएच 18 बीएच 1242) जबर धडक दिली. त्यात त्यांचा गंभीररित्या जखमी होवून मृत्यू झाला. याबाबत राजेंद्र पवार यांच्या तक्रारीनुसार रिक्षा चालक विलास वामन पाटील (रा. ओसवाल नगर, देवपूर) याच्याविरोधात देवपूर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास एएसआय चिंचोलीकर करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या