Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News : विधानसभा निवडणूक निकालाविरोधात नाशिकमधून तीन याचिका

Nashik News : विधानसभा निवडणूक निकालाविरोधात नाशिकमधून तीन याचिका

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) होऊन सरकारही स्थापन झाले. मात्र निवडणूक प्रक्रियेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अजूनही सुरूच आहेत. निवडणूक निकालाविरोधात याचिका (Petitions) दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातून तीन याचिका दाखल झाल्या आहेत.

- Advertisement -

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांच्याविरोधात मालेगाव बाह्य मतदारसंघातून बंडू बच्छाव यांनी, कळवणचे आ. नितीन पवार यांच्याविरोधात कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी तर मालेगाव मध्यमधून असिफ शेख यांनी मुफ्ती मोहंमद यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. तीन आमदारांविरोधात याचिका दाखल झाल्या आहेत.

YouTube video player

दरम्यान, याचिका मुंबई खंडपीठामध्ये (Mumbai Bench) दाखल असून विजयी उमेदवारांच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणुकीतील कवित्व अजूनही काही दिवस कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक झाल्यापासून ईव्हीएमविरोधात प्रचार सुरूच आहे. आता त्यात याचिकांची भर पडली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Fire News : सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

0
सिन्नर | वार्ताहर | Sinnar तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी (Malegaon MIDC) परिसरातील मोहदरी वन उद्यानाजवळ असलेल्या “विमा ॲरोमॅटिक्स” या कंपनीला आज अचानक भीषण आग (Fire) लागल्याची...