Tuesday, October 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजब्रह्मगिरी पर्वतावर दगड कोसळून तीन यात्रेकरू जखमी

ब्रह्मगिरी पर्वतावर दगड कोसळून तीन यात्रेकरू जखमी

त्र्यंबकेश्वर । वार्ताहर Trimbakeshwar

ब्रह्मगिरी पर्वतावर दगड कोसळून तीन यात्रेकरू किरकोळ जखमी झाले. धुळे येथील विशाल गिरासे (28), शेगाव येथील नेहा डावरे (28) आदी तिघे जण रात्री ब्रह्मगिरी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी अचानक दगड पडून तिघे जण जखमी झाले.

- Advertisement -

येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर सुशील कुमार शिंदे यांनी त्यांच्यावर उपचार केले. दोघांच्या हाताला मार लागला आहे. जयश्री गिरासे यांना डोक्याला मार बसला. दगड कशामुळे पडले ते कळू शकले नाही.

ब्रह्मगिरी पर्वतावर धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र वन विभागाकडून त्याबाबत गांभीर्य दाखवले जात नसल्याची भाविकांची तक्रार आहे.

ताज्या बातम्या

AMC : मोकाट कुत्रे 25 हजार, निवारा केंद्राची क्षमता 500!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता महापालिकेने पिंपळगाव माळवी येथे 500 कुत्र्यांच्या क्षमतेचे श्वान निवारा केंद्र (सेंट्रल...