Monday, May 27, 2024
HomeनाशिकNashik Crime News : तलवारीसोबत रिल्स बनवणाऱ्या तीन रिल्स स्टारला अटक; स्थानिक...

Nashik Crime News : तलवारीसोबत रिल्स बनवणाऱ्या तीन रिल्स स्टारला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तलवार (sowrd) हातात घेवुन रिल्स (reels ) बनवुन ती इंस्टाग्रामवर (Instagram) अपलोड करणाऱ्या सिन्नर शहरातील (Sinnar City) तीन रिल्स स्टारला ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक (Arrested) करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून दोन तलवारी देखील जप्त करण्यात आल्या आहेत…

- Advertisement -

शहरातील शाहु हॅाटेल परीसरात पल्सर मोटार सायकलवर बसत तलवार हातात घेवुन हवेत फिरवताना इंस्टाग्रामवर १-धीरज या अंकाउटद्वारे व्हिडीओ अपलोड करून शहरात दहशत पसरवण्याचे काम सुरू होते. त्यानंतर या प्रकाराची माहीती गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना प्राप्त झाली होती.

Nashik Crime News : चाेरलेल्या नऊ दुचाकी हस्तगत; युनिट दाेनची कारवाई, दाेघांना अटक

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात शोध घेतला असता व्हिडीओतील ऋषिकेश राजेंद्र बोरसे (२४) रा. वावीवेस, धिरज बाळु बर्डे (२१) रा. सातपीर गल्ली हे दोघे सातपीर गल्लीत मिळून आले. त्यांच्याकडे रिल्समधील तलवारीबाबत चौकशी केली असता त्यांनी शहरातील ढोके नगर भागात राहणाऱ्या गुरुनाथ भागवत हलकुंडे याच्याकडून सदर तलवारी घेतल्याचे सांगितले.

त्यांनतर पोलिसांनी (Police) गुरुनाथला हॅाटेल शाहुच्या जवळ ताब्यात घेतले. त्याच्याकडे तलवारींबाबत चौकशी केली असता त्याने २ तलवारी या पंजाब, अमृतसर येथुन विकत आणल्याचे सांगत सदर तलवारी मनेगाव रोड येथे त्यांच्या गायींच्या गोठयात लपवुन ठेवल्याचे कबूल केले. यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष मनेगाव रोड लगत असलेल्या गोठयात छापा टाकून २ स्टेनलेस स्टीलच्या तलवारी जप्त केल्या आहेत. यात एकूण तीन मुलांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्यांना सिन्नर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, सदरची कारवाई पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधिक्षक आदीत्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सतिष जगताप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम, कुनाल मोरे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या