Saturday, May 4, 2024
HomeनाशिकNashik : विहिरीचा बार उडविताना भीषण दुर्घटना; तीन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर

Nashik : विहिरीचा बार उडविताना भीषण दुर्घटना; तीन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

तालुक्यातील हिरडी (Hiradi) या गावात रात्रीच्या सुमारास विहीरीचे खोदकाम सुरू होते. त्यावेळी बार उडविण्यात आला. यावेळी कामगार असल्याने यात ३ कामगारांचा मृत्यू (Death) झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbak Taluka) हिरडी या गावात मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका विहीरीचे खोदकाम सुरू होते.

Nashik : अल्पवयीन विद्यार्थिनीवर वसतीगृहात अत्याचार; दोन अधीक्षक निलंबित

त्यावेळी स्फोट घडवून विहीर खोदली जात होती. मात्र, अचानक झालेल्या या स्फोटामुळे विहिरीत असलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाला. तर १ कामगार गंभीर जखमी झाला आहे. हे कामगार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Video : १३ दिवस उलटूनही आंदोलन सुरूच; सहाय्यक निबंधकांसमोर शेतकरी आक्रमक

दरम्यान, या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकेसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर गंभीर जखमी कामगाराला नाशिक येथील शासकिय जिल्हा  रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच याप्रकरणी हरसुल पोलिस (Police) अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या