वणी | वार्ताहर | Vani
येथील वणी-पिंपळगाव रस्त्यावरील (Vani-Pimpalgaon Road) बोराळे फाट्यानजीक (Borale Phata) तवेरा कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू (Death) झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हे देखील वाचा : नाशकात महागणेशाेत्सव; ७५० सार्वजनिक मंडळांकडून नाेंदणी
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वणी-पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्यानजीक रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान वणीकडून (Vani) पिंपळगावकडे जाणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एमएच १५ बीए २२२९ या दुचाकीस पाठीमागून येणाऱ्या तवेरा कार क्रमांक एमएच १९ एपी ९९३३ ने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील गौरव तुकाराम पवार (२०) मंगेश रमेश हिलीम (२३) व विजय रमेश हिलीम (१६) रा. करसुळ, ता.निफाड हे गंभीर जखमी झाले.
हे देखील वाचा : तेराव्याचा कार्यक्रम आटोपून निघाले अन्… ; १७ जणांचा जागीच मृत्यू
त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. तर झालेल्या अपघाताची माहिती न देताच चालक फरार झाल्याची माहिती मिळाली असून सपोनि सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस (Police) तपास करीत असून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : पुन्हा हिट अँड रन! गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना भरधाव कारनं चिरडलं
दरम्यान, या अपघातात (Accident) मृत्यू पावलेले मंगेल हिलीम व विजय हिलीम हे सख्खे भाऊ असून ते वणी येथील जमिर शेख यांच्या शेतात शेतमजुर म्हणून काम करीत होते. ते वणी येथील करसुळ येथे जात असतांना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा