Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रसंतापजनक! धावत्या लोकलमध्ये दिव्यांगला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

संतापजनक! धावत्या लोकलमध्ये दिव्यांगला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

मुंबई | Mumbai

मुंबईकरांची लाईफलाईन असेलली मुंबई लोकल (Mumbai Local) एका दिव्यांग व्यक्तीसाठी जीवघेणी ठरली आहे. धावत्या रेल्वेत एका गर्दुल्ल्याने दिव्यांग व्यक्तीला जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

पीडित व्यक्तीवर सध्या केईएम (KEM) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर लोकलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे धक्कादायक कृत्य करणाऱ्या आरोपीचा ठाणे रेल्वे पोलिसांकडून (Railway Police) सध्या शोध सुरु आहे.

अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धावत्या रेल्वेत प्रवाशाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रमोद वाडेकर (वय 35) असं या अपंग प्रवाशाचं नाव आहे.

हा प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण लोकलमध्ये अपंग व्यक्तिच्या डब्यातून प्रवास करत होता. लोकल कळवा मुब्रा स्थानकात येताच एका गर्दुल्यानं त्याच्यासोबत वाद घातला.

ठाकरेंच्या मालेगावातील सभेआधी संजय राऊतांचा शिंदेंवर ‘वार’, दादा भुसेंना दिला इशारा

त्यानंतर रुमालाला आग लावून तो रुमाल या प्रवाशाच्या अंगावर फेकला. या घटनेत हा प्रवासी जखमी झाला. या प्रकरणातील संशयीत आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या