Wednesday, May 22, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून ; 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2023 या आठवड्यात जन्मलेल्या...

किरोच्या नजरेतून ; 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

सौ.वंदना अनिल दिवाणे

जन्मतारखेनुसार भविष्य..

- Advertisement -

27 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, रवि, नेपच्यून, या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट अशी आहे कुणी दबाव आणला तर खपवून घेणार नाही बंड करून उठाल. शांततेने व सबुरीने वागण्याची कला अवगत करावी. इच्छाशक्ती प्रबळ असल्याने महत्त्वाकांंक्षा पूर्ण कराल यात शंका नाही. धाडसी स्वभावामुळे नवनवीन कल्पना कार्यान्वित कराल. क्रोधाच्या अतिरेकाने नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत एक तर मोठ्या प्रमाणावर यश मिळेल किंवा त्याच्या उलट तितक्याच प्रमाणावर नुकसान होण्यााची शक्यता आहे.

28 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, हर्शल, नेपच्यूनया ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. ग्रहांच्या चौकटीमुळे करिअर व दर्जात नेहमी बदल होत रहातील. भोवतालच्या वातावरणाचा प्रभाव राहील. अनेक धाडसी प्रसंगांना सामोरे जावे लागेल. घर व कुटुंबाविषयी प्रेम राहील. स्वभाव शांत व संवेदनशील राहील. इतरांच्या प्रश्नासाठी संघर्ष करत रहाल. व्यवसायात सारखे बदल करीत राहिल्यास आर्थिक स्थिती बिघडून जाईल. एकाच व्यवसायात टिकून राहील्यास आर्थिक स्थिती चांगली राहील.

29 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, रवि, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास सिंह आहे. कल्पनाशक्ती दांडगी आहे. त्यामुळे आकांक्षा फार मोठ्या असतील. आणि विशेष म्हणजेे त्या पूर्ण करण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. हाताखालच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे काम करावे असा हट्ट राहील. करिअरमध्ये नाटकी परिस्थिती निर्माण कराल त्यामुळे प्रमुख तुम्हाला निवडल्याशिवाय वरिष्ठानां दुसरा पर्याय नसेल. उत्साहाच्या भरात पैसे मिळवण्याची कोणतीही संधी दिसली की, त्यात गुंतवणुकीची घाई कराल. त्यामुळे काही योजनांत यश मिळेल. तरी काहीत मात्र नुकसान होईल.

30 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, रवि, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. निडर व धाडसी स्वभावामुळे समोरच्याच्या तोंडावर दोष सांगण्यास कमी करणार नाही. वरिष्ठाची मर्जी संपादन कराल. हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. बौद्धीक क्षमता उच्च प्रकारची असल्याने विचारांची पातळीही वरची राहील. हाताखालच्या लोकांत जेवढे प्रिय व्हाल तेवढेच वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. आर्थिक स्थितीच्या बाबतीत घाबरण्याचे काम नाही. आयुष्याच्या पूर्वार्धात पेरलेल्या कष्टाचे चीज उत्तरार्धात फळफळून वर येईल.

31 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, चंद्र, नेपच्यून, या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. स्वभाव इतरांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण जाईल. नातेवाईक व कौटुंबिक सदस्यांमुळे कोर्टाची पायरी चढावी लागेल. आर्थिक बाबतीत विचीत्र स्वभावामुळे इतरांशी जमणार नाही. एकट्याने केेलेली गुंतवणूक फायद्याची राहील.

1 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या सूर्य, हर्शल या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. तीव्र बुध्दी आणि विचारांची झेप वेगवान आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. शासकीय अधिकारी, नगरपालिका, कोणत्याही सामाजिक कामात जास्त यश मिळेल. हर्शलच्या प्रभावामुळे जीवनाशी संबंधित भावी घटनांची चाहूल लागेल. आर्थिक बाबतीत भाग्य चांगले साथ देईल. सुरूवातीचा काही काळ अडचणीचा जाईल. कष्टाच्या जोरावर पुढील आयुष्यात धनी लोकात गणना होईल.

2 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, सूर्य, नेपच्यून ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौेकट अशी आहे की, बौद्धीक व सामाजिक क्षेत्रात महत्व प्राप्त होईल. आत्मविश्वास दांडगा असून अनेक लोकांचा विश्वास संपादन कराल. प्रगतीच्या संधी नेहमी वाट पहातील. कलाक्षेत्रात चांगले यश मिळू शकेल. वागण्यातील चलाखी व मुत्सद्देगिरीमुळे व्यवस्थापनात उत्तम यश मिळेल. आर्थिक क्षेत्रात फार भाग्यवान रहाल. पण पैशाबद्दल मनापासून आकर्षण राहील. विविध मार्गाने धनप्राप्ती होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या