Saturday, June 15, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून ; 21 ते 27 सप्टेंबर 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे...

किरोच्या नजरेतून ; 21 ते 27 सप्टेंबर 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

सौ. वंदना अनिल दिवाणे

- Advertisement -

जन्मतारखेनुसार भविष्य..

21 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. आहे त्या परिस्थितीपासून वरचा दर्जा प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहणार आणि उन्नती झाली मनाचे समाधान होणार नाही. त्याहीपेक्षा वरचा दर्जा मिळवण्यासाठी सतत आटोकात प्रयत्न करीत राहणार आहात. तशी उन्नती जरी झाली तरी मनाचे समाधान काही होणार नाही. त्याहीपेक्षा वरचा दर्जा प्राप्त करण्यासाठी अविरत परिश्रम कराल. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत भिण्याचे कारण नाही.तरी नसती चिंता करण्याची सवय जाणार नाही.

22 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, बुध, हर्षल, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. हर्शलच्या प्रभावामुळे भौतिक व स्वतंत्र अशा कल्पना सुचतील. त्यामुळे स्वभाव विचीत्र आहे. असे प्रतिस्पर्ध्यांना वाटेल. कोणाशी लवकर मैत्री करणे जमणार नाही. त्यामुळे मित्रांची संख्या कमी राहील. साहजिकच शत्रूसंख्या वाढती राहील. आर्थिक बाबतीत अनेक जणांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. स्वतंत्रपणे चांगला पैसा मिळेल.

23 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास तुला आहे. निरनिराळ्या व्यक्ती व वेगवेगळ्या परिस्थितीशी सहज जमवून घ्याल. हा तुमचा प्लस पॉईट आहे. कोणत्याही प्रकारचे करिअर अथवा धंदा असला तरी त्यात सहज यशस्वी होऊ शकाल. एकाच वेळी अनेक प्रकारच्या उलाढालीत आणि उद्योगात भाग घेतल्याने आर्थिक स्थिती चांगली होणार यात शंका नाही.

24 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. जीवनावर शुक्राचा प्रभाव जास्त राहील. सुरूवातीला अनेक प्रेमप्रकरणे असली तरी नंतरच्या काळात विवाहानंतर जीवन सुरळीत होईल. वैवाहिक सुख सुरळीत होतील. पारंपारिक कौटुंबिक धंदा स्वीकाराल किंवा धाडस आणि स्वतंत्र जीवनाच्या प्रबळ इच्छेमुळे घर सोडून स्वतंत्र करिअर उभे कराल. भाग्याची चांगली साथ लाभेल. मित्र व सहकार्‍यांच्या भरघोस आर्थिक मदतीमुळे आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

25 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, चंद्र, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. आदर्शवादाकडे कल राहील. विचार उच्च असून कल्पनाशक्तीही प्रबळ राहील.तुमची महत्त्वाकांक्षा मात्र भौतिक प्रगतीशी संबंधित राहील. गूढशास्त्राबद्दल आकर्षण वाटेल. पण ते असेल त्यातील अंद्धश्रद्धा शोधण्यासाठी. दुसर्‍याला एखादी गोष्ट पटवतांना तिची कारणे सविस्तर समजावून सांगत पण आपली मते दुसर्‍यांवर लादणे आवडणार नाही. आर्थिक बाबतीत काळजी घेणे हा स्वभाव धर्म आहे. संधी चुकवू नका. धनी व्हाल.

26 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या शनी, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. सुरूवातील प्रगतीत अनेक अडथळे येतील. वयाच्या 35 व्या वर्षानंतर अशा सर्व अडथळ्यांना पार करून प्रगतीकडे वाटचाल बिनधास्तपणे चालू होईल. जास्त मिसळून रहाणे जमणार नाही. कष्टाची जन्मतःच आवड आहे. तुमच्या कष्टाचे फळ लुबाडण्याचा इतर लोक प्रयत्न करतील. सावध रहावे. अतिसावधानतेमुळे झालेल्या आर्थिक संधी वाया जाऊ न दिल्यास आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

27 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास तुला आहे. स्पष्टवक्तेपणा हा विशेष गुण आहे. दुसर्‍याचा दोष त्यांच्या तोंडावर सांगणे कधी कधी महागात पडेल. शत्रुसंख्या सतत वाढत राहील. यांत्रिक कामापासून फार फायदा मिळवू शकाल. मेेकॅनिकल इंजिनिअर होऊन यंत्राद्वारे फायदा मिळवू शकाल. पैसा मिळवणे अवघड काम नाही कामाच्या झपाट्यामुळे भरपूर पैसा मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या