– सौ.वंदना अनिल दिवाणे
जन्मतारखेनुसार भविष्य..
31 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. स्वतंत्र बाण्याचे आहात. विचार आणि कृतीने तुमचे वेगळेपण इतरांच्या लक्षात येण्यासारखे आहे. त्यामुळे काही लोक तुमचा स्वभाव विचीत्र आहे असे समजण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोक आणि नातेवाईकांशी जमणार नाही. दुसर्याने आणलेले दडपण सहन होत नाही. आर्थिक बाबतीतही अशीच परिस्थिती राहील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पैशाचे तुम्हाला विशेष आकर्षण नसले तरी पैसा स्वतःहून चालत येईल.
1 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, हर्षल, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. निसर्गाबद्दल प्रेम वाटेल. प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणे आवडते. कामाशिवाय स्वस्थ बसणे जमणार नाही. भाषा प्रभुत्व चांगले राहील. सौंर्द्याचे विशेष वेड राहील. अनेक करिअरमध्ये नशीब आजमावाल. आयुष्याच्या मध्यंतरानंतर योग्य करिअर प्राप्त झाल्यानंतर झपाट्याने प्रगती कराल. अर्थप्राप्तीची तीव्र इच्छा असूनही तशी संधी मिळण्यास बर्याच अडचणी येतील. जीवनाच्या उत्तरार्धात अथर्र्प्राप्तीची खर्याअर्थाने संधी प्राप्त होतील. वरिष्ठाचा विश्वास संपादन केल्यामुळे उच्चपद प्राप्तीद्वारे अधिक अर्थप्राप्तीची संधी प्राप्त होईल.
2 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. कल्पनाशक्ती चांगली असून बुद्धीमत्ता अतीशय तीक्ष्ण आहे. मात्र वारंवार बदल करण्याच्या स्वभावामुळे त्याचा फायदा घेता येणार नाही. साधी रहाणी उच्च विचारसरणी असे जीवन राहील. आत्मविश्वासात वाढ करण्याचा प्रयत्न केल्यास जीवनात उत्तम यश मिळवू शकाल. निसर्गाची आवड राहील. मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम केल्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. टीकात्मक लेखनाद्वारा अर्थप्राप्ती होऊ शकेल.
3 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. लहानपणापासून काही तरी भव्य करावे अशी महत्त्वाकांक्षा राहील. सतत कार्यरत रहाल. एक लक्ष्य गाठले की दुसरे लक्ष्य गाठण्यासाठी उत्सुक असाल. या गडबडीत दुर्लक्ष झाल्यामुळे अचानक काहींना काही आजार निर्माण होण्याचा धोका आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. पण कितीही पैसा मिळवला तरी मनाचे समाधान न झाल्यामुळे उगीच चिंता करीत आणखी धडपड रहाल.
4 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि,हर्षल, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. हर्शलच्या प्रभावामुळे स्वभाव काहीसा विचीत्रसा असेल. कल्पना मौलिक असल्याने इतरांपेक्षा स्वतंत्र व वेगळ्या असतील. प्रगतीसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागत असल्याने मानसिक त्रास होईल. कारण इतरांबरोबर मैत्री करणे जुळवून घेणे जमणार नाही. त्यामुळे इतरांकडून सहकार्य मिळणे कठीण जाईल. आथिर्र्क बाबतीत इतरांचे सहकार्य घेण्याचे प्रयत्न केल्यास फसवणूक होण्याची शक्यता आहे. पण एकट्याने अर्थप्राप्तीचा प्रयत्न केल्यास फार उत्तम यश मिळेल.
5 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. कोणत्याही व्यक्तीशी कशाही परिस्थितीत हात मिळवणी करण्यात हातखंडा राहील. कोणत्याही करिअरचा स्वीकार कराल. कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवण्याची बुद्धीमत्ता जवळ असल्यामुळे एकाचवेळी अनेक उद्योग करण्याची प्रबळ इच्छा राहील. पण असे केल्यास धावपळ आणि फजिती होईल. आवडत्या कार्यक्षेत्रापैकी एक किंवा दोन निवडून त्यात करिअर केल्यास उत्तम प्रगती होईल. अर्थप्राप्ती करणे जड जाणार नाही. मधून मधून भाग्याची विशेष साथ लाभेल.
6 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास कन्या आहे. सवार्र्ंविषयी सहानुभूती वाटेल. विवाहानंतर जीवन सुरळीत चालू राहील. देवावर श्रद्धा असल्याने धार्मिक कार्याकडे विशेष लक्ष राहील. आर्थिक प्राप्तीच्या बाबतीत भाग्यवान आहात. मित्रांकडून हवी तितकी आर्थिक मदत मिळत राहील.