Thursday, September 19, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून: 12 ते 18 ऑक्टोबर 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

किरोच्या नजरेतून: 12 ते 18 ऑक्टोबर 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

– सौ.वंदना अनिल दिवाणे

- Advertisement -

जन्मतारखेनुसार भविष्य..

12 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू,शुक्र, शनी,या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. बुध, गुरूच्या प्रभावामुळे महत्त्वाकांक्षा दांडगी राहील. इच्छाशक्ती प्रबळ राहील. घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कृती केल्याशिवाय चैन पडणार नाही. जीवनात यश मिळवण्याच्या दृष्टीने ग्रहांची युती चांगली आहे. उच्च विचार आणि उच्च पदावर सतत दृष्टी राहील. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. व्यापार व आर्थिक उलाढालीत उत्तम यश मिळेल.

13 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्शल,शुक्र, सूर्य, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. हर्षल, शनी यांच्या एकत्रित प्रभावामुळे जीवनात अनेक बदल व विचीत्र अनुभव संभवतात. त्यातल्या त्यात शुक्र दुर्बल असल्यामुळे विवाहाच्या बाबतीत वेगळ्या प्रकारचे अनुभव येतील. आयुष्यात विचीत्र मंडळींशी संबंध येत राहतील. ज्यांचा भौतिक प्रगतीसाठी काही उपयोग होणार नाही. भागीदाराच्या बाबतीत आर्थिक फायदा तर सोडाच तुम्हालाच त्यांच्यासाठी झीज सोसावी लागेल.

14 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, शुक्र,शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. ग्रहांची चौकट अतिशय मनोरंजक असून त्यामुळे व्यक्तिमत्व सामर्थ्यवान होईल. शनी प्रबळ आणि शुक्र कमजोर असल्याने प्रेमाच्या बाबतीत फार विचीत्र अनुभव येतील. कौटुंबिक जबाबादार्‍या पार पाडतांना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. तुमच्या सल्ल्याच्या आधारावर मित्र धनी होेतील. तोच निर्णय तुमच्यासाठी वापरा धनी व्हाल.

15 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. शुक्राच्या प्रभावाने तुम्हाला आर लोकप्रियता मिळेल. मित्रांची संख्या जास्त राहील. व्यक्तीमत्वात एक प्रकारची संमोहनशक्ती आहे. प्रेमविवाह किंवा बहु विवाहाची शक्यता आहे. समाजात चांगली प्रतिष्ठा, सन्मान प्राप्त होईल. आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत लकी रहाल. स्वतःच्या निर्णयाने केलेली आर्थिक उलाढाल जास्त फायद्याची राहील.

16 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, शनी, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण राहील. यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. मनाचा समतोल राखू शकलात तर जीवनात उत्तम प्रगती होईल. कल्पनाशक्ती चांगली असल्याने काव्य, साहित्य, चित्रकला, यासारख्या कलांमध्ये प्रचंड यश मिळेल. आर्थिक स्थिती चढ उताराची राहील. कधी एकदम श्रीमंत तर कधी सामान्य स्थिती असे चक्रासारखे चालू राहील.

17 ऑेक्टोबर – वाढदिवस असलेल्या शनी, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. वारसाहक्काने संपत्ती मिळाल्यास जास्त शारीरिक श्रम पडणार नाही. जीवन सुखाचे जाईल. बुद्धिमत्ता तीक्ष्ण असल्याने सामान्य व्यक्ती ज्या विषयाचा अभ्यास टाळतात त्याचा सखोल अभ्यास करून त्यापासून मोठा नावलौकीक प्राप्त होईल. डॉक्टर, वैज्ञानिक, राजकारण यात उत्तम यश मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. अन्यथा आय व व्यय याचा मेळ बसविण्यात ओढाताण होईल.

18 ऑक्टोबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंंगल, शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास तुला आहे. उतावळ्या व तर्कट स्वभावामुळे अनेक भांडणे निर्माण होतील. त्यामुळे शत्रुंची संख्या मोठी राहील. वकील किंवा राजकारणी स्वभावामुळे चांगले यश मिळू शकते. पण तेथेही कलहाच्या अतिरेकामुळे शत्रुकडून प्रगतीत अडथळे येतील. साधारणपणे आर्थिक बाबतीत चांगले यश मिळू शकेल. उच्चपद प्राप्ती झाली तर त्यावर टिकणे कठीण जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या