Saturday, May 4, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

15 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, बुध,या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. बुधामुळे शुक्राचे सामर्थ्य वाढलेले आहे. सर्वांशी सहानुभूतीने वागाल. संसार व जागेविषयी फार प्रेम वाटेल. आर्थिक आवक हा भाग्योदयकारक प्रश्न आहे. नातेवाईकच नव्हे तर मित्रदेखील अडचण आल्यास स्वतःहून मदतीसाठी धावून येतील. बक्षीस व वारसाहक्काने बरीच संपत्ती मिळेल. घर, जमीन यात गुंतवणूक राहील.

- Advertisement -

16 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. तुम्ही फार आदर्शवादी आहात. विचार उच्च स्तराचे असतील. कल्पनाशक्ती चांगली आहे. भौतिक सुखाचे फार आकर्षण वाटेल. तर्कावर उतरल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसत नाही. पूर्वार्धात सुखसोई प्राप्त करण्यासाठी खर्च आला तरी उत्तरार्धात वैभवाचा उपभोग घ्याल. आर्थिक बाबतीत सर्व सोयी उपलब्ध असूनही चिंता करण्याची सवय कमी होणार नाही.

17 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. आयुष्याच्या पूर्वार्धात प्रगतीत अनेक अडचणी येतील. केलेल्या कामाचे श्रेय व फायदा इतर लोक घेण्याचा प्रयत्न करतील. उत्तरार्धात जीवन तौलनिकदृष्ट्या बरेच सुखकर होईल. मात्र दुसर्‍यांचा टीका करण्याची प्रवृत्ती कमी करायला हवी. संशयी व सावध रहाण्याच्या सवयीमुळे आर्थिक बाबतीत मिळालेल्या संधीची बस आयुष्यात अनेक वेळा चुकेल नंतर पश्चाताप होईल.

18 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. मंगळ आधि बुधाचे एकमेकांशी बर्‍याच अंशी चांगले जमत असल्यामुळे तुमचा उत्साह व निश्चयात्मक शक्तीमुळे जीवनात उत्तम यश मिळेल. मोठ्या कंपनीत पदाधिकारी म्हणून उत्तम प्रकारे काम करू शकाल. आर्थिक बाबतीत जीवनात उत्तम यश मिळेल.

19 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या बुध,सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. हर्शल आणि बुध यांच्या प्रभावामुळे विचारांची गती व ज्ञानग्रहणशक्ती चांगली राहील. निसर्गाच्या चिंतनाची फार आवड राहील. पैसे मिळवण्याची फार महत्त्वाकांक्षा राहील. सुरूवातीला त्यात मोठ्या प्रमाणात अडथळे येतील. कारण अस्थिर मन व असमाधानी स्वभाव यातून निर्माण होणार्‍या चिंता हे असेल. मनाची एकाग्रता वाढविल्यास आर्थिक बाबतीत चांगले यश मिळेल.

20 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, नेपच्यून, चंद्र या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास कन्या आहे. सुपीक बुद्धीमत्तेतून अनेक योजना आकार घेतील त्यासाठी वेळ पडल्यास प्रवास करून त्या यशस्वी कराल. जीवनाला आवश्यक तेवढेच उपलब्ध असावे अशा विचारामुळे पैशाच्या पाठीमागे न धावता बौद्धिक कार्यात मग्न रहाल.

21 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. महत्त्वाकांक्षा दांडगा आहे. आहे त्या परिस्थितीपासून वरचा दर्जा प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहणार आणि उन्नती झाली तरी मनाचे समाधान होणार नाही. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत भिण्याचे कारण नाही.तरी नसती चिंता करण्याची सवय जाणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या