Friday, May 24, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून : या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

किरोच्या नजरेतून : या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

सौ.वंदना अनिल दिवाणे

२० ते २६ जुलै २०२३

- Advertisement -

जन्मतारखेनुसार भविष्य..

20 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, नेपच्यून, सूर्य, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कर्क आहे. कल्पनाशक्ती चांगली असल्यामुळे महत्त्वाकांक्षा व स्वप्ने मोठ मोठी असतील. आश्चर्य म्हणजे यश मिळण्याचे फारच चान्सेस आहेत. कामाविषयी उत्साह दांडगा असेल.हाताखालच्या लोकांना तुमच्या आदेशाप्रमाणे वागावे असा आग्रह राहील. कलाक्षेत्रात विशेष क्रांती करता येईल.आर्थिक स्थितीत चढ उतार राहील. त्याचे कारण गुंतवणूकीच्या बाबतीत घाईगर्दीने निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती एकाच पातळीवर ठेवणे जड जाईल.

21 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, चंद्र, नेपच्यूनया ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कर्क आहे. स्वतंत्र बाण्याचे, धाडसी, निडर असून बोलण्यातूून व धोरणातून हे गुण दिसतात. उदार स्वभाव असल्यामुळे सर्वांविषयी सहानुभूती दाखवाल. स्वतः जबाबदारी घेऊन ती वेळेत पूर्ण केल्यामुळे वरिष्ठ व कनिष्ठ लोकांत प्रिय व्हाल. जीवनाकडे पाहण्यचा दृष्टीेकोन उच्च व बौद्धिक स्तरातून आहे. अधिकारीयुक्त नोकरीत करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत घाबरण्याचे मुळीच कारण नाही. सुरूवातीला पेरलेल्या श्रमाचे बीज पुढील आयुष्यात फळेल.

22 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, रवि, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास सिंंह आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, व्यक्तीमत्व इतरांपासून वेगळे असेल त्यामुळे कामानिमित्त संपर्कात येणार्‍या व्यक्तीशी जमवून घेणे जड जाईल. विचार आणि कल्पना मौिेलक असतील. कुटुबातील सदस्य व नातेवाईक इ. मुळे अनेक अडचणी येतील. कारण नसतांना कोर्टाचे हेलपाटे घालावे लागतील. आर्थिक उलाढालीच्या बाबतीत कुणाशी पटणार नाही. आर्थिक बाबतीत स्वतःचे स्वतंत्रपणे निर्णय घेतल्यास आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

23 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, रवि, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंंह आहे. वरील तीनही ग्रहांचे परिणाम जीवनावर होणार आहेत. स्वभाव संवेदनशील असल्याने भोवतालच्या परिस्थितीचा लोकांवर परिणाम होणार आहे. तुमचा सहकार्य करण्याचा स्वभाव लबाडांच्या लक्षात आल्यास गैरफायदा घेतील. स्वतःच्या कल्पना आर्थिक उलाढालीत कार्यान्वित केल्यास मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होईल.

24 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, रवि, नेपच्यून, या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. जीवन इतरांपेक्षा वेगळे असेल. महत्त्वाकांक्षा दांडगी व मेहनतीची तयारी असल्याने बरोबरीच्या लोकांना मागे टाकून पुढे निघून जाल. दयाळू स्वभाव व उदार व्यक्तीमत्वाचा उपयोग महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी उपयोग होईल. भाग्यवान असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील.

25 जुलै – वाढदिवस असलेल्या रवि, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. इच्छाशक्ती व मानसिक बल प्राप्त केले तर वरील ग्रहांची चौकट भाग्याची ठरेल. स्वभाव भावनाप्रधान आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावर कलाक्षेत्रात प्रगती कराल. जन्मतःच प्रतिभेची देणगी मिळाली आहे त्याला प्रयत्न व कष्टाची जोड दिल्यास आपल्या क्षेत्रात उच्च पद प्राप्त कराल. पैशाविषयी आकर्षण नसल्यामुळे कामाला उत्तम प्रतिसाद मिळाला तरी त्यातून धनप्राप्ती होईलच असे नाही. आर्थिक बाबतीत आयुष्य इतरांपेक्षा वेगळे राहील. अनोळखी व्यक्ती अचानक जीवनात आल्याने उत्तम आर्थिक प्रगती व त्यानंतर उलट होण्याची शक्यता आहे.

26 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, शनि, नेपच्यून ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास सिंह आहे. जीवनाच्या सुरूवातीला अंगावर मोठी जबाबदारी पडल्याने अनेक अडचणी निर्माण होतील. सबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर मात करून चांगली प्रगती करू शकाल. 62 तारखेचा जन्म असल्यामुळे शनी ग्रहाचा प्रभाव असल्याने धर्मावर श्रद्धा राहील.करिअरसाठी तुम्ही ज्या क्षेत्रात प्रवेश कराल त्यात उच्च पदवी प्राप्त होईल. कामातील चिकाटी व कष्टाच्या तयारीमुळे पूर्वार्धात आर्थिक स्थिती जेमतेम असलेी तरी उत्तरार्धात आर्थिक स्थिती चांगली होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या