Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजन'आतषबाजी तुमने शुरु की, खत्म मै करुंगा'; टायगर-३ चा धमाकेदार ट्रेलर आऊट

‘आतषबाजी तुमने शुरु की, खत्म मै करुंगा’; टायगर-३ चा धमाकेदार ट्रेलर आऊट

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा आता प्रेक्षकांना पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसणार असून कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या आगामी ‘टायगर ३’ चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. टायगर ३ चा (Tiger 3 Trailer Out) धमाकेदर ट्रेलर आज रिलीज झाला आहे.

- Advertisement -

पहिल्या दोन्ही सिनेमांचे ब्लॉकबस्टर यश पाहता तिसऱ्या भागाकडूनही चाहत्यांना खूप अपेक्षा वाढल्या आहेत. ‘टायगर 3’चा प्रोमो आणि पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. आता सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सच्या या सिनेमाने ट्रेलरमध्येच धुमाकूळ घातला आहे. सलमान खान, कतरिना कैफच्या जबरदस्त स्टंटने लक्ष वेधून घेतलेय.

ट्रेलरच्या सुरुवातीला एक महिला बोलताना दिसत आहे जी म्हणते की देशाची शांतता आणि त्याच्या शत्रूंमध्ये फक्त एका पुरुषाचे अंतर आहे. मग सलमान भिंत तोडून आत प्रवेश करतो आणि बाईक चालवतो आणि अनेक छतांवरून उड्या मारतो. बऱ्याच अ‍ॅक्शननंतर सलमान खान कॅटरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्यानंतर पार्श्वभूमीत इमरान हाश्मीचा आवाज येतो जो म्हणतो ‘ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे कुटुंब.’ अन् ‘टायगर ३’ची कथा इथून सुरू होते.

सलमान खान हा ट्रेलरमध्ये काही स्टंट करताना दिसत आहे. तसेच कतरिनाचे देखील काही अ‍ॅक्शन सीन्स टायगर- ३ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. ‘आतिशबाजी तुमने शुरू की खत्म मैं करूंगा’ सलमानचा हा डायलॉग देखील टायगर-३ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐकू येतो. टायगर ३ चित्रपटाचा हा २ मिनिटे ५१ सेकंदाचा ट्रेलर पाहिल्यानंतर यंदा ‘सलमान हा दिवाळीला बॉक्स ऑफिसवर धमाका करणार’, असा अंदाज नेटकरी लावत आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या