Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्या'इतक्या' हजार कोटीचा महसूल जमा; नोंदणी आणि मुद्रांक विभागाची ऑक्टोबरपर्यंतची कामगिरी

‘इतक्या’ हजार कोटीचा महसूल जमा; नोंदणी आणि मुद्रांक विभागाची ऑक्टोबरपर्यंतची कामगिरी

मुंबई | प्रतिनिधी

राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने ऑक्टोबर महिन्यात सरकारने ठरविलेल्या महसूल उत्पन्नाच्या उद्दिष्टापैकी सुमारे ५० टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या १२ तारखेपर्यंत १४ लाख ५८ हजार ६६१ दस्त संख्येची नोंद करीत २३ हजार ५२७ कोटी रुपयांचे महसूली उत्पन्न जमा केले आहे. यंदा २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी या विभागाला ४५ हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.

- Advertisement -

सन २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाला देण्यात आलेल्या २९ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठताना त्यांनी १२१% उदिष्टपूर्ती करीत ३५ हजार १७१ कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा केला होता. तसेच सन २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाला देण्यात आलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या उद्दिष्ट साध्य करताना त्यांनी १३९% उदिष्टपूर्ती करीत ४४ हजार ६६९ कोटी रुपयांचा महसूल शासनाकडे जमा केला होता.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नोंदणी आणि मुद्रांक विभागाला आधुनिक तसेच गतीमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार आनलाईन पध्दतीने होत असल्याने त्यात पारदर्शकता आली आहे. तसेच जनतेसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देतानाच टप्प्याटप्प्याने नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयाचे स्वरूपही त्यांनी पालटून टाकण्याचा मानस आहे.

नोंदणी आणि मुद्रांक विभागातर्फे जमीन खरेदी विक्री व्यवहार, भाडेकरार, सदनिका विक्री, दस्त नोंदणी, विवाह नोंदणी आणि मृत्यूपत्र नोंदणी आदी कामे केली जातात. कमी मन्युष्यबळाचा वापर करून सर्वाधिक उत्पन्न देणारा विभाग अशी ओळख नोंदणी आणि मुद्रांक विभागाने निर्माण केली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या