शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
पहलगामच्या हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाने आपली संरक्षण सिध्दता जगाला दाखवून देतानाच आत्मनिर्भर भारताचे दर्शनही घडविले आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून तयार झालेल्या संरक्षण साहित्याचा उपयोग करुन लढवय्या जवानांनीही पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.
ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) यशस्वी कामगिरीबद्दल सिमेवरील जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांचे मनोधर्य वाढविण्यासाठी देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी (Shirdi) येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत निवृत जवान शहीद जवानांचे कुटूबिय, देशभक्त नागरीक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन तिरंगा रॅली काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी शिर्डी परिसर दणाणून गेला. शताब्दी सभागृहात या रॅलीचा समारोप झाला. प्रारंभी डॉ. सुजय विखे पाटील यांनी सर्व निवृत जवान आणि शहीद जवानांच्या कुटूबियांचा सन्मान केला.
ना. विखे पाटील म्हणाले, पहलगाम येथे 27 निरपराध व्यक्तींवर केलेल्या हल्ल्याला देशाने करारा जबाब दिला आहे. पाकिस्तानच्या घरामध्ये घूसून ऑपरेश सिंदूर यशस्वी करतानाच देशातील 140 कोटी जनता बळी गेलेल्या कुटूंबियांच्या पाठीशी आहे. परंतु या बरोबरीनेच सिमेवर लढणार्या जवानांही देशाचे पाठबळ आहे हे दाखवून देण्यासाठीच सर्वत्र तिरंगा रॅली उत्स्फुर्तपणे निघत असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानने केवळ अतिरेकी घडविण्याचे अड्डे निर्माण केले होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अतिरेक्यांचे नऊ प्रशिक्षण केंद्र भारताने उद्ध्वस्त करुन पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे.
ड्रोनचा वापर करुन पाकिस्तानने भारताच्या विविध प्रांतामध्ये हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या बहादुर जवानांनी त्यांचे ड्रोन हल्ले आकाशातूनच परतवून लावले. तिनही सैन्य दलांनी एकत्रितपणे केलेल्या यशस्वी कामगिरीतून समृध्द बलाढ्य आणि आत्मनिर्भर भारताचे दर्शन घडले आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशात उत्पादित झालेल्या संरक्षण साहित्याची यशस्विता जगाला समजली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या देशात राहून पाकीस्तानसाठी हेरगिरी करणार्यांना आता पाकिस्तानात पाठविण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्षाचे लोक जवानांच्या कर्तबगारीवर शंका उपस्थित करताता याचा तीव्र शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही असे सांगून पाकिस्तानला ठणकावले आहे.हा फक्त ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी है हे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे. एक जरी हल्ला झाला तरी त्याला युध्दाप्रमाणेच उत्तर देण्याचा भारताना दिलेला इशारा हा खुप सुचक आहे. भारतीय नागरिक म्हणून आपणही वेळप्रसंगी कर्तव्य बजावण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.