Thursday, March 27, 2025
Homeदेश विदेशतिरूपती बालाजीची संपत्ती जाहीर; वाचा सविस्तर

तिरूपती बालाजीची संपत्ती जाहीर; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | New Delhi

तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. देश-विदेशातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळते. या मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देतात. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे.

- Advertisement -

तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी म्हणाले, देशात देवस्थानाच्या 960 मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत 85,705 कोटी रुपये आहे. 1974 ते 2014 सालादरम्यान वेगवेगळ्या सरकारच्या अंतर्गत मंदिर समितीने 113 मालमत्ता निकाली काढल्या आहेत. मात्र, 2014 नंतर एकाही मालमत्तेची विक्री केली नाही.

राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करून मागील विश्वस्त मंडळाने दरवर्षी संपत्ती आणि मालमत्तेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे 2021 साली पहिली तर, यंदा दुसरी श्वेतपत्रिका काढण्यात आली आहे. दोन्ही श्वेतपत्रिका तिरुपती देवस्थानच्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. भाविकांना पादर्शक कारभार आणि देवस्थानाच्या संपत्तीचे जतन करण्याचे वचन देतो, असे सुब्बा रेड्डी यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, तिरूपती बालाजी देवस्थानाची विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 14 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी आहेत. तर, 14 टन सोन्याचा साठाही देवस्थानाकडे आहे. त्यामुळे तिरूपती बालाजी देवस्थान जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : “… तर आदित्य ठाकरेंना अटकही होऊ शकते”; शिंदेंच्या...

0
मुंबई | Mumbai यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) दिशा सालियन मृत्यू (Disha Salian Murder Case) प्रकरण चांगलेच गाजले. आधी दिशाने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात...