Saturday, May 25, 2024
Homeनगरतिसगाव येथे टवाळखोरांकडून शालेय विद्यार्थ्यांना मारहाण

तिसगाव येथे टवाळखोरांकडून शालेय विद्यार्थ्यांना मारहाण

करंजी |प्रतिनिधी|Karanji

मुलींचे छेडछोडीचे प्रकार सुरू असतानाच पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना टवाळखोर युवकांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला.

- Advertisement -

पवन आव्हाड, आसिफ पठाण यांच्यात किरकोळ वाद झाला त्यानंतर किशोर बुधवंत व विशाल कारखेले यांनी भांडण मिटवले त्यानंतर तिसगाव येथील काही टवाळखोर तरुणांनी एकत्रित येत एका स्वीटच्या दुकानात घुसून किशोर बुधवंत व विशाल कारखेले या दोघांना जबर मारहाण केली. या मारहाणी नंतर शिरापूर त्रिभुवनवाडी येथील ग्रामस्थांनी शनिवारी तिसगावमध्ये येऊन या तरुणांचा शोध घेऊन त्यांना जशास तसे उत्तर देण्याच्या प्रयत्नात असतानाच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तिसगाव येथील वृद्धेश्वर चौकात येऊन वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला.

तिसगाव मधील ज्या तरुणांनी दोन शालेय विद्यार्थ्यांना मारहाण केली त्यांचे विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. किशोर सोपान बुधवंत (रा. शिरापूर) या विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरमान पठाण, सोहेल लालखाँ पठाण, आतिक पठाण, मोसिन शेख, आझाद पठाण, तोहेब असीफ सय्यद सर्व राहणार तिसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 तासात या सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक मुटकुळे यांनी दिल्यानंतर तिसगाव मधील वातावरण शांत झाले. यावेळी भाऊसाहेब लवांडे पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, सरपंच नितीन लोमटे, काका पाटील लवांडे, अखिल लवांडे, ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर आदींनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या