Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशटायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणं ठरलं जीवघेणं, 'त्या' अब्जाधीशांसह पाच ही जणांचा मृत्यू......

टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणं ठरलं जीवघेणं, ‘त्या’ अब्जाधीशांसह पाच ही जणांचा मृत्यू… समुद्रात नेमकं काय घडलं?

दिल्ली | Delhi

तब्बल ११२ वर्षांपूर्वी अटलांटिक महासागराच्या तळाशी हरवलेल्या टायटॅनिक या अजस्र जहाजाच्या अवशेषांच्या अभ्यास मोहिमेवर गेलेली टायटन ही पाणबुडी चार दिवसांपासून बेपत्ता होती. केवळ ९६ तास पुरेल इतका प्राणवायूचा साठा घेऊन ही पाणबुडी रविवारी (१८ जून) समुद्राच्या तळाशी झेपावली होती. परंतु काहीच तासांनी या पाणबुडीचा संपर्क तुटला. त्यानंतर ही पाणबुडी बेपत्ता झाली.

- Advertisement -

अमेरिकेसह कॅनडाच्या नौदलाने तसेच पाणबुडी ऑपरेट करणाऱ्या कंपनीने ही पाणबुडी शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु पाणबुडीचा शोध लागला नाही. अखेर या पाबुडीतील लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पाणबुडी ऑपरेट करणारी कंपनी ओशिएनगेटने दिली आहे. कंपनीने या पाणबुडीतल्या पाचही प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे. या घटनेने जगभरात खळबळ उडाली असून ब्रिटनमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शोध पथकाला टायटॅनिक जहाजाजवळ हरवलेल्या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. यूएस कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार पाणबुडीचे अवशेष सापडल्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. कॅनडाच्या एका जहाजात बसलेल्या मानवरहित रोबोटने पाणबुडीचे अवशेष शोधून काढल्याचे सांगण्यात येत आहे.१८ जून रोजी अमेरिकन कंपनी ओशनगेटची ही पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी प्रवासाला निघाली. टायटॅनिकचा टूर या भग्नावस्थेपर्यंत पोहोचणे, तिथे फिरणे आणि नंतर परत येणे हे सुमारे आठ तास चालते. टायटॅनिकच्या ढिगाऱ्याजवळ जायला दोन तास लागतात. चार तास पाणबुडी भग्नावस्थेचा परिसर दाखवते. त्यानंतर परतायलाही सुमारे दोन तास लागतात.

लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO

इंग्लंडमधील कोट्यधीश हामिश हार्डिंग यांच्या नेतृत्त्वाखाली पाच पर्यटकांची टीम टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी अटलांटिक महासागरात गेले होते. परंतु संपर्क तुटल्यानंतर पाणबुडी अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड या देशांच्या नौदलाने बेपत्ता पाणबुडीला अटलांटिक महासागरात शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केलं होतं. परंतु आता बचाव पथकाला बेपत्ता पाणबुडीचे अवषेश सापडले आहे. पाणबुडीत स्फोट झाल्याने पाच पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती संयुक्त नौदलाकडून देण्यात आली आहे. या पाणबुडीत ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हामिश हार्डिंग (वय ५८) यांच्यासह पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद (वय ४८) आणि त्यांचा मुलगा सुलेमान (वय १९) हे देखील होते. या तीन पर्यटकांशिवाय एक पायलट आणि एक कंटेंट एक्सपर्ट असे एकूण पाच लोक असलेल्या पाणबुडीनं न्यूफाऊंडलँडच्या सेंट जॉन्स इथून पाण्यात डुबकी लावली. तब्बल दोन कोटी रुपये खर्च करत हामिश हार्डिंग यांनी टायटॅनिक पाहण्याची योजना आखली होती, अखेर त्याला अपयश आलं आहे, तसेच हामिश हार्डिंग यांना जीव गमवावा लागला आहे. हामिश हार्डिंग यांनी आफ्रिकेतून भारतात चित्ते आणण्याच्या योजनेत मोठी भूमिका बजावली होती, त्यामुळं आता त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे भारतातही शोक व्यक्त केला जात आहे.

डाॅक्टरने संपवले अख्खे कुटूंब, तिघांची हत्या करत स्वतः केली आत्महत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या