Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसची गुरुवारी राज्यभर पदयात्रा

काँग्रेसची गुरुवारी राज्यभर पदयात्रा

मुंबई | प्रतिनिधी

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो पदयात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज, गुरुवारी राज्यात पदयात्रा काढली जाणार आहे. पदयात्रा आणि जाहीर सभा असा कार्यक्रम प्रदेश काँग्रेसने दिला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात संध्याकाळी पाच ते सहा पदयात्रा आणि त्यानंतर जाहीर सभा होणार आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांवर जिल्हावार जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांपासून या भारत जोडो यात्रेची सुरुवात केली जाणार आहे. त्याआधी दुपारी १ वाजता सर्व जिल्ह्यात काँग्रेसचे प्रमुख नेते पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील मोदी सरकारने महागाई वाढवून जनतेची कशी लूट केली याचा पर्दाफाश करणार आहेत.

देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले असतानाही मोदी सरकारला महागाई दिसत नाही. सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. पण मागील ९ वर्षात मोदी सरकार महागाईवर नियंत्रण ठेवू शकले नाही.

९ वर्ष जनतेची लूट केल्यानंतर आता त्यांना जनतेची आठवण झाली असून गॅस सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केली आहे. गॅस स्वस्त केल्याचा भाजप आणि मोदी सरकार मोठा गाजावाज करत आहे. परंतु ते खरे नाही. मोदी सरकारने ९ वर्षात जनतेला कसे लुटले याची पोलखोल या पत्रकार परिषदांमधून केली जाणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या