जळगाव – Jalgaon
भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभर मंदीरे उघडण्यासाठी आज दि.२९ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे, आंदोलनात… (व्हीडीयाे)
- Advertisement -
गणपती मंदिर तरसोद येथे घंटा नाद करण्यात आला. या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) तथा जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे, जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यात त्यांनी राज्य शासनाला जागे करण्यासाठी व मंदिरे उघडण्या संदर्भात घोषणा देऊन घंटा नाद केला.
विशेष म्हणजे त्यांनी नियमांचे पालन करत मंदिरांच्या कोणत्याही घंट्यास हात न लावता सोबत आणलेला घंटा वाजवून आंदोलन केले. यावेळी त्यांचेसह गणेश माळी, जळगाव तालुका सरचिटणीस संदीप पाटील, ललित बऱ्हाटे, सुदाम राजपूत, अरूण बऱ्हाटे, स्वप्नील भांडारकर, शांताराम माळी उपस्थित होते.