धुळे dhule । प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड (Hadakhed)आरटीओ चेक पोस्टजवळ शिरपूर तालुका पोलिसांनी (police) सापळा लावून तंबाखु (Tobacco), गुटख्याची वाहतूक रोखली. 10 लाखांचा ट्रक व 12 लाखांच्या सुंगधी तंबाखुचे 40 बॉक्स असा एकुण 22 लाखांचा मुद्देमाल जप्त (seized) करण्यात आला. याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपुर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाठ यांना बातमी मिळाली की, एक आयसर कंपनीची लाल रंगाची सहा चाकी गाडीमध्ये (क्र. एच आर 55 ए एल 0526)े सुंगधी तंबाखु असुन ती गाडी दिल्लीकडुन महाराष्ट्रातील धुळ्याकडे येत आहे. त्यावरून (हाडाखेड ता. शिरपुर) येथे पथकाने सापळा लावला. त्यावेळी संशयित वाहनाला थांबवून चालकास गाडीमधील मालाबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून वाहन हे शिरपुर तालुका ठाण्यात आणून तपासणी केली असता वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेले सुंगधीत तंबाखुचे बॉक्स आढळून आले.
त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेले सुंगधीत तंबाखुचे एकुण 40 बॉक्स (प्रत्येक बॉक्समध्ये 6 बॅग, प्रत्येक बॅगेत 5 किलो ग्रॅम) असा मुद्देमाल आढळून आला. सुशिलकुमार अयोध्या प्रसाद याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 10 लाख रूपये किंमतीची एक आयसर गाडी, 12 लाख रूपये किंमतीचा सुंगधी तंबाखुचे 40 बॉक्स असा एकुण 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशार काळे, पोलीस निरिक्षक अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई संदिप पाटील, पोना संदीप ठाकरे, पोकॉ संतोष पाटील, पोकॉ योगेश मोरे, पोकॉ रणजित वळवी, चापोकॉ मनोज पाटील यांच्या पथकाने केली आहे. गुन्हयाचा तपास उपनिरीक्षक संदिप पाटील हे करीत आहे.