नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात 112 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत…
- Advertisement -
तर मागील चोवीस तासात 135 रूग्णांनी करोनावर मात केली. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्या रूग्णांच्या संख्येत घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे…
जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 112 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील (Nashik City) संख्या 35 इतकी आहे.
आज ग्रामिण भागात (Nashik Rural) 63 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात (Malegoan) 1. तर जिल्हाबाह्य 13 रुग्णांची नोंद झाली आहे.