Saturday, July 27, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात दिवसभरात १३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दिवसभरात १३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात १३६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ८६ रूग्णांनी करोनावर मात केली.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या ५१ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ८० रुग्ण तर, जिल्हाबाह्य ०५ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला ( Death Of Corona Patients ) यात नाशिक ग्रामीण विभागातील १ रुग्णांचा तर नाशिक शहरातील ३ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ५८७ इतका झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या