निफाड। प्रतिनिधी Niphad
निफाड विधानसभा निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी चार वाजता पिंपळगाव बसवंत येथील मा.ल. जाधव हायस्कूलच्या पटांगणावर आज प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू व स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सह राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सभेचे आयोजक प्रहार जनशक्ती पक्ष, स्वराज पक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना , रिपब्लिकन काँग्रेस पार्टी पक्षाच्या सर्व पदाधिकार्यांनी या सभेसाठी निफाड तालुक्यातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे .महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या समस्या निवारण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विचारातून मार्गदर्शन करणार्या या दोन व्यक्तिमत्त्वाचा धसका सर्वच राजकीय पक्षांनी घेतल्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा ,द्राक्ष ,टोमॅटो ,बेदाणा, यासाठी प्रसिद्ध असणार्या पिंपळगाव नगरीत कडू बोल कोणाच्या बाबतीत गोड ठरतात व परिवर्तनाची लाट आजी माजी आमदारा विरोधात कशी जनतेत निर्माण करतात.
याकडे समस्त महाराष्ट्रातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे अत्यंत कमी कालावधीत प्रहार जनशक्ती पक्षाचे तसेच परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांनी निफाड तालुक्यातील जनतेपुढे दोघात तिसरा सक्षम पर्याय तालुक्यातील जनतेपुढे निर्माण केल्याने तालुक्यात जवळपास दोन प्रचार दौरे ही त्यांनी पूर्ण केले आहे. तर आजच्या सभेतून गुरुदेव कांदे आपल्या भाषणातून कसा चौकार व षटकार ठोकतात कारण जनतेच्या मनातील समस्या त्यात मग आदिवासी समाजातील विविध समस्या, निसाका, रासाका, नाशिक जिल्हा बँक ,दोन्ही बाजार समिती, शिवार रस्ते, मोठी औद्योगिक वसाहत, प्रलंबित उड्डाणपूल ,तरुणांच्या हाताला काम , शेतमालावर प्रक्रिया उद्योग, दोन्ही बाजार समिती ना जोडणारा महामार्ग या विषयावर त्यांनी संपूर्ण तालुक्यात रान उठवले असून जनतेच्या या अनेक वर्षापासूनच्या समस्या त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केल्यामुळे निसाका रासाका भाडेतत्त्वावर म्हणा की खाजगी करता ऐवजी सहकारात चालवण्यासाठी कांदे यांनी प्राधान्यक्रम दिला आहे. हा त्यांचा विषय तालुक्यातील जनतेला भावला आहे.
मणी मंगळसूत्र मोडून उभा केलेला निसाका रासाका परत सहकारात आणण्यासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक, सभासद, कामगार वर्ग गुरुदेव कांदे यांच्या मागे दिवसो दिवस मोठ्या संख्येने उभा राहत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर सभेत ना. बच्चू कडू व छत्रपती संभाजी राजे यावर काय शिक्कामोर्तब करून जनतेच्या मनात परिवर्तन घडवतात व 20 तारखेला मतदानाच्या रूपातून बदल घडवत 23 तारखेला प्रचंड मताधिक्याने हा सर्वसामान्य जनतेचा लोकसेवक निवडून येण्यासाठी परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही असे गुरुदेव कांदे मित्र मंडळ परिवर्तन महाआघाडीच्या सर्व पदाधिकार्यांनी सांगितले आहे.