Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे –

पुणे शहरात दिवसभरात 338 करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर 1 लाख 72 हजार 897 इतकी संख्या झाली आहे. तर आज चार

- Advertisement -

रुग्णांचा मृत्यू झाला असून 4 हजार 514 मृतांची संख्या झाली.आज 317 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर 1 लाख 63 हजार 296 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 167 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 281 जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 93 हजार 814 वर पोहचली असून पैकी, 90 हजार 179 जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 869 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या