Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई –

राज्यात आज 5 हजार 111 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 17 लाख 42 हजार 191 करोना बाधित रुग्ण बरे होऊन

- Advertisement -

घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 93.45 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 4 हजार 981 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात दिवसभरात 75 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.57 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 14 लाख 47 हजार 723 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 64 हजार 348 नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात 5 लाख 43 हजार 91 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. 5 हजार 105 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला 73 हजार 166 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 4 हजार 981 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 18 लाख 64 हजार 348 इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या 75 मृत्यूंपैकी 63 मृत्यू हे मागील 48 तासातले आहेत. तर 12 मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या