Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई –

महाराष्ट्रात आज दिवसभरात राज्यात 3 हजार 824 नवे करोनाबाधित आढळले, तर 5 हजार 8 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. तसेच

- Advertisement -

70 रुग्णांचा करोनामुळे दिवसभरात मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 18 लाख 68 हजार 172 वर पोहचली आहे.

राज्यातील करोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 93.52 टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या राज्यातील अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या 71 हजार 910 असून, 17 लाख 47 हजार 199 जण करोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 47 हजार 972 वर पोहचली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 15 लाख 2 हजार 427 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 68 हजार 172 (16.24 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात 5 लाख 41 हजार 59 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. 5 हजार 137 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या