Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई –

राज्यात आज 2774 करोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण 17 लाख 49 हजार 973 रुग्णांनी

- Advertisement -

आतापर्यंत करोनावर मात केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 93.46 टक्के झाला आहे. आज राज्यात 4 हजार 268 करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात आज 87 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर सध्या 2.57 टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 15 लाख 70 हजार 137 नमुन्यांपैकी 18 लाख 72 हजार 440 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 32 हजार 288 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 5 हजार 122 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला 73 हजार 315 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज राज्यात 4 हजार 268 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 18 लाख 72 हजार 440 इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या 87 मृत्यूंपैकी 38 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 23 मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित 26 मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीपेक्षा कमी कालावधीतले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या