Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई –

राज्यात आज 1 हजार 924 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत करोना बाधित रुग्णांची

- Advertisement -

एकूण संख्या 19,92,683 इतकी झाली आहे. राज्यात 50,680 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज 35 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या 50,473 वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.53 टक्के एवढा आहे.

राज्यात आज 35 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई 7, पिंपरी चिंचवड मनपा 3, सोलापूर 3, नागपूर 6, वर्धा 3 यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या 35 मृत्यूंपैकी 21 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 2 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 12 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 12 मृत्यू नागपूर 4, पुणे 4, वर्धा 3 आणि नाशिक 1 असे आहेत.

आज 3,854 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत 18,90,323 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.86 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,38,45,897 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 19,92,683 (14.39 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,21,280 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,094 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या