Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात ‘आज’ इतके नवे करोना रुग्ण

राज्यात ‘आज’ इतके नवे करोना रुग्ण

मुंबई –

महाराष्ट्रात आज 2 हजार 697 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर आज दिवसभरात 3 हजार 694 जणांनी करोनावर

- Advertisement -

मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.22 टक्के आहे. आतापर्यंत राज्यात 19 लाख 10 हजार 521 जणांनी करोनावर मात केली आहे.

आज 56 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 20 लाख 6 हजार 354 वर पोहचली आहे. याशिवाय राज्यात 43 हजार 870 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत 50 हजार 740 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1,41,45,829 नमुन्यांपैकी 20 लाख 6 हजार 354 (14.18टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 13 हजार 678 जण गृहविलगीकरणात असून, 1 हजार 993 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या