Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई –

महाराष्ट्रात आज 6 हजार 218 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या

- Advertisement -

राज्यातील मृत्यू दर 2.45 टक्के एवढा आहे. आतापर्यंत राज्यात 51 हजार 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 5 हजार 869 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 20 लाख 5 हजार 851 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 94.96 टक्के एवढे झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1,58,60,912 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 21 लाख 12 हजार 312 (13.32टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 79 हजार 288 जण गृहविलगीकरणात आहेत, तर 2 हजार 484 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 53 हजार 409 आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या