Sunday, September 8, 2024
Homeभविष्यवेधआजचे राशी भविष्य 24 ऑक्टोबर 2023 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 24 ऑक्टोबर 2023 Today’s Horoscope

मेष –

या सप्ताहात राशिस्थानी आलेले प्रभावी ग्रह व गुरूकृपा यांच्या साथीने आपला विविध क्षेत्रांतील प्रभाव वाढीला लागेल. आपल्या मनातील ठरविलेल्या गोष्टी साकार होणारे ग्रहमान आपणास लाभले आहे, त्याचा लाभ घ्या. सामाजिक, शैक्षणिक, कला क्षेत्राला उत्तम प्रोत्साहन मिळू लागेल. प्रवासाचे योग येतील. सरकारी कामांना प्राधान्य द्या. अनेक प्रकारचे निर्णय घेता येतील. व्यवसायात प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. संततीकडून अध्ययनात यश मिळू शकेल. प्रकृतीबाबत अधिक दक्ष राहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

- Advertisement -

वृषभ –

आपले ग्रहमान आपणास साथ देणारे नसल्याने पुष्कळशा बाबतीत अडथळे येण्याची शक्यता असल्याने आपणाकडून चुका होणार नाहीत याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपलेच खरे करण्याचा हट्ट न धरता सामंजस्य बाळगणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्याही कारणाने आपली प्रतिष्ठा डागाळणार नाही याची काळजी घ्या व त्या दृष्टीने वागण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारा. आर्थिक बाबतीत तज्ञांचे मार्गदर्शन घेणे योग्य राहील. चिंता करू नका. रागावर योग्य नियंत्रण ठेवा.

मिथुन –

आपले ग्रहमान पाहता या सप्ताहात आपण हाती घेतलेल्या कार्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याने आपण योजलेले कार्य साध्य करण्यास आपणास यश मिळेल. नोकरी-व्यवसायात बरीचशी सुलभता मिळू शकेल. आर्थिक बाजू सावरता येईल. जुने येणे येण्याची शक्यताही आहे. गोड बोलून आपले कार्य साध्य करण्याचे धोरण स्वीकारून यशाची वाटचाल करा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मुलांकडून अपेक्षित गोष्टी होतील. स्वार्थी लोकांपासून दूर राहणे योग्य राहील. जोडीदाराची मदत मिळेल.

कर्क –

आशा-आकांक्षा पल्लवित होतील. या सप्ताहात येणारे सण आपणास आनंद व उत्साह देतील. शिक्षण, राजकारण, क्रीडा अशा क्षेत्रांत यशाची अपेक्षा ठेवता येईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. घरात काही शुभ संकेत मिळण्याची शक्यता राहील. घरासंबंधीच्या प्रश्नांना छान गती मिळेल व अपेक्षांची पूर्तता लाभू शकेल. सामाजिक क्षेत्रात आपली छाप पाडू शकाल. सरकारी नियमांचे पालन करा. काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. जोडीदाराचे उत्तम सहाय्य मिळेल.

सिंह –

हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पार पाडू शकाल. कामाचा उत्साह राहील. कामाची ओढाताण झाली तरी एकंदरीत हा आठवडा सर्व दृष्टीने चांगला जाईल. कार्यक्षेत्र व व्यवसाय या दोन्ही ठिकाणी विवेकाचा योग्य वापर करा. कोणताही निर्णय आवेशात न घेता विचारपूर्वक घेणे हितकारक ठरेल. प्रवासाचे योग येतील. नव्या ओळखींचा लाभ मिळू शकेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. प्रकृतीमान ठीक असले तरी खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत.

कन्या –

मनात योजिलेली स्वप्नपूर्ती साकार करणारे ग्रहमान आपणास लाभले आहे. कला, व्यापार, संगीत आदी क्षेत्रांत भरघोस यशाची अपेक्षा ठेवू शकता. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. सामाजिक क्षेत्रात आपण आपली छाप पाडू शकाल. हाती घेतलेल्या कार्यात प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. मित्रपरिवारांशी सुसंवाद साधता येईल.

तूळ –

हुशारी, सामंजस्य व संयम यांचा अवलंब केल्यास आपण बर्‍याचशा गोष्टी साध्य करू शकाल. कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेता विचारपूर्वक घ्या. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. प्रवासही कराल. कौटुंबिक वातावरण वादासारख्या गोष्टींनी बिघडणार नाहीत याची दक्षता घ्या. प्रकृतीबाबत विशेष लक्ष द्यावे, विशेषत: मोसमी सर्दी, खोकला, ताप इत्यादी. दुसर्‍यांबद्दलचे मत व्यक्त न करणे योग्य ठरेल. कमी महत्त्वाच्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. खर्चावर नियंत्रण ठेवा. विवाहइच्छुकांना सुवार्ता समजतील.

वृश्चिक –

आपल्या कार्यक्षेत्रात आपण दक्ष राहावे. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. आर्थिक गुंतवणूक सध्या पुढे ढकलणेच योग्य राहील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. एखादी चूक कौटुंबिक वातावरण दूषित करण्याची शक्यता असते, तेव्हा जपून शब्द वापरा. धार्मिक कार्यात अधिक रस घ्याल. प्रकृतीबाबत अधिक जागरूक राहा. सार्वजनिक क्षेत्रात काम केलेल्या कार्याची प्रशंसा होईल. आर्थिक नव्या जबाबदार्‍या घेण्याचे टाळा. कोणालाही दुखवू नका. हा आठवडा सर्वसाधारण स्वरूपाचा राहील.

धनु –

ग्रहमान बर्‍यापैकी साथ देणारे असल्याने नशिबाचीही साथ आपणास लाभणार आहे. प्रवासाचे योग संभवतात. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तेव्हा प्रथमपासून खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सावधानता बाळगा. प्रकृतीबाबत अधिक जागरूक राहा. प्रत्येक कार्यात आपणास मदतीचा हात मिळेल. आपले नाव प्रसिद्धीच्या झोतात येण्याची शक्यता आहे. आपल्या लौकिकात भर पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मकर –

शनी साडेसातीच्या पर्वातून आपण प्रवास करीत आहात हे विसरून चालणार नाही. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. अकरावा गुरू आपणास सर्व बाबतीत मोलाची मदत करील. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा. कौटुंबिक जीवन सुखमय राहील. नातलगांना भेटण्याचे योग संभवतात. कुटुंबातील उत्तम वातावरण सकारात्मक ऊर्जा भरण्यास उपयोगी होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ उपयुक्त ठरेल.

कुंभ –

ग्रहमानाची बर्‍यापैकी साथ आपणास मिळणार असल्याने विविध क्षेत्रांत म्हणजे कला, साहित्य, व्यापार आदी क्षेत्रांत प्रगतीची संधी प्राप्त होईल. नोकरदारांना चांगला दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला उत्तम प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे बेत साध्य होतील. भाग्यस्थानी असलेला गुरू आपणास मोलाची मदत करील व कामकाजात यश मिळविण्यात हातभार लावील. विवाहइच्छुकांच्या मनोकामना पुर्‍या होतील. काही भाग्यवंतांना बढतीची संधी मिळू शकते. प्रकृतीमान ठीक राहील पण काहींना घशाचा त्रास संभवतो.

मीन –

नोकरदारांना मोठा दिलासा मिळू शकेल. इतरांवर विसंबून कोणतेही काम हाती घेऊ नका. चांगल्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा. व्यसनी, कुसंगतीपासून दूर राहणे हितकारक राहील. राजकारण, क्रीडा क्षेत्रांत प्रगती करू शकाल. नको त्या प्रलोभनात अडकू नका. सरळ मार्ग स्वीकारा. प्रकृतीबाबत अधिक लक्ष द्या. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. जोडीदाराशी सामंजस्याने वागा.

- Advertisment -

ताज्या बातम्या