Sunday, May 26, 2024
Homeभविष्यवेधआजचे राशी भविष्य 26 नोव्हेंबर 2023 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 26 नोव्हेंबर 2023 Today’s Horoscope

मेष –

आजचा दिवस थोडा कष्टदायक जाणार आहे. नातेवाईकांशी वाद होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण देखील वाढणार आहे. त्यामुळे आज वाद विवाद टाळा. आज आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. आज प्रवास टाळावा.

- Advertisement -

वृषभ –

आजचा दिवस चांगला आहे. चंचल स्वभावावर नियंत्रण ठेवा. आज वाहने काळजीपूर्वक चालवा. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे. जुने आजार नव्याने उद्भभवन्याची शक्यता आहे. व्यापार रोजगारात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा.

मिथुन –

मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असमाधान आणि असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळावेत. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीन करावे. विचलित व्हाल. मनस्तापासारखा घटना घडली. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे.

कर्क –

भाग्य अनुकुल आहे. मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. त्याचबरोबर लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. महिलावर्गास शासनाकडून मान-सन्मान मिळेल.

सिंह –

कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहिल. व्यापारात आर्थिक लाभ होणार आहे. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन योजनेत वाढ विस्तार करण्यासाठी अनुकुल दिवस आहे. नोकरीत इच्छेनुसार बदली व बढती मिळेल.

कन्या –

प्रशासकीय कामं मार्गी लागतील. मुलांना शिक्षणात आणि व्यापारात यश मिळेल.व्यावसायिक अडचणी दूर होतील. विदेश प्रवासाचे योग आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.

तुला –

आजचा दिवस काळजी घेण्याचा आहे. कामाच्या आणि व्यावसायात आतताई निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टीकोनातून तणाव जाणवेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल.

वृश्चिक –

आजचे दिनमान चांगले आहे. रखडलेली कामे पूर्ण होईल. आज जे प्रयत्न कराल ते प्रामाणिकपणे करा यश मिळेल. विद्यार्थांना शिक्षणात प्रगती होईल. व्यापार आणि व्यवसायात भरभराट होईल. शत्रूवर मत्वकराल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.

धनु –

कामाच्या ठिकाणी चांगल्या गोष्टी घडतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल. परदेशात जाण्याचा योग आहे. व्यावसायिक अडचणी दूर होतील.

मकर –

नात्यात मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात गुंतवणूक करण्याचा विचार टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.

कुंभ –

व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. प्रवास लाभकारी ठरतील. दुरवरचे प्रवास घडतील.

मीन –

व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. धार्मिक प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी होतील. त्यातून फायद्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या