Wednesday, December 4, 2024
Homeभविष्यवेधआजचे राशी भविष्य 1 जानेवारी 2024 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 1 जानेवारी 2024 Today’s Horoscope

मेष –

शुभवार्ता ऐकायला मिळतील. रोजगारात जबाबदारीनुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायद्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रकृती आस्थिर व बैचेन राहील.आर्थिक हानी नुकसान, फसवणुक होण्याची शक्यता आहे.व्यवहार काळजीपूर्वक शक्यतो दुरचे प्रवास टाळावेत.

- Advertisement -

वृषभ –

आपल्या प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिकदृष्ट्या अनेक मोठे प्रश्न हातावेगळे कराल.व्यापारात अचानक यश मिळेल. शुभवार्ता ऐकायला मिळतील.संततीकडून समाधान लाभेल. सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. राजकीय क्षेत्रातील सहकारातील व्यक्तींना मोठे परिवर्तन पाहायला मिळेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

मिथुन –

रोजगारात समाधानकारक स्थिती राहील. काहीना पगारवाढ व बदलीची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. संततीच्या महत्वाच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. घरातील अडचणी दूर होतील.

कर्क –

कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. विवाहइच्छुकांचे विवाह जमतील. निरनिराळ्या सुचनाच्या कल्पना आमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे.प्रवासातून मोठे लाभ घडतील आरोग्य उत्तम राहिल.

सिंह –

नोकरी रोजगारात फार मोठा धोका पत्करणे योग्य ठरणार नाही. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मनावर संयम ठेवा. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका जोखमीचे काम आज करू नका. प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल. सावधतेने वाटचाल करावी. एखादा प्रकरणात विनाकारण गुंतले जावू शकता.वाईट संगत अंगलट येईल. दुरचे प्रवास शक्यतो टाळा. वाहने सावकाश चालवा. गैरमार्गाचा अवलंब टाळा. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. नवीन समस्या उद्भभवू शकतात. मनाचा समतोल राखा.

कन्या –

न्यायालयीन कामात यश मिळेल. रोजगारात एखादी महत्वाची पण विलंबाने झालेली कृती फायदयाची जाणवेल. काही नवीन आलेले प्रस्तावाचे स्वागत केले जाईल. योजलेली काम वेळेत पूर्ण होतील.खर्च वाढणार आहे. परंतु, उत्पन्नात देखील वाढ होईल. नवदांपत्यास आंनदाची बातमी मिळेल. मित्रमैत्रिणीसोबत आर्थिक व्यवहार मात्र टाळावेत. व्यापारात भागीदारांकडून नवीन प्रस्ताव येतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. पती पत्नीत स्नेह वाढेल.

तुळ –

विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील. आपल्यावर आळ येण्याची शक्यता वाटते. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. विरोधकांकडून त्रास होईल. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे.मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. कागदोपत्री व्यवहार तपासून पहावा.जुन्या व्याधी, आजारपण शारीरीक मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक –

कामकाजामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर आलेल्या योजना यशस्वी होतील. व्यापारात काहींना अचानक धनलाभाच्या संधी मालामाल करतील. नोकरीत व्यापारात चांगले काहीतरी करण्याची मानसिकता निर्माण होईल. संततीकडून शुभ संदेश मिळतील. वाचनाची आवड निर्माण होईल दिर्घकालीन सहलीचा आनंद सहकुटुंब लुटाल. अविवाहितांना विवाह योग आहे. शासकीय कामकाजाचे प्रश्न मार्गी लागतील. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक संबंध राहतील.विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल.

धनू –

अपेक्षेप्रमाणे यश आणि फळ मिळणार आहे. वाहन घर चैनीच्या वस्तु खरेदी करण्याचा योग आहे. व्यापारी वर्गाला आपले व्यापार कौशल्य सिद्ध करता येईल. महत्वाचे निर्णय फायदेशीर ठरतील.वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. मनोबल वाढेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. घरात शुभसामाचार अथवा मंगलकार्य असा योग आहे. सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. ेस्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीत यश मिळेल. आरोग्य उत्तम राहणार आहे.

मकर –

काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. समाजात मानसन्मान वाढेल. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या व्यक्तींना नोकरीत विशेष संधी उपलब्ध होईल. अनेकांकडून सहकार्य लाभेल. नातेवाईकांचे, भांवडाचे विशेष सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळणार असून व्यापारात फायदेशीर व्यवहार राहतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. आर्थिकदृष्या कोणावरही कोणत्याही आश्वासनांवर विसंबून न राहता हाती येईल तेच खरे ही भूमिका घ्यावी. जवळच्या व्यक्तींकडून उपयुक्त सल्ला मिळेल.

कुंभ –

कुटुंबात मोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल. कायद्यातील वादाचा निपटारा होईल. व्यवसायातील योजना गुप्त ठेवा. काही विशेष कामानिमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे नियोजन आखावे लागेल. व्यवसायात अनुकूल असे यश मिळेल.आर्थिक योग उत्तम आहेत. कोणावरही अंधविश्वास बाळगू नका. एखादी आनंदाची शुभवार्ता ऐकायला मिळेल. कुंटुबातील पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले आहे. कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण राहिल. समोरच्या व्यक्तींवर आपला प्रभाव राहील.नवे नाते संबंध जुळतील.

मीन –

आखलेल्या योजना पूर्ण होणार आहेत. मित्र किंवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल.आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत मोठे लाभ होतील तसेच परिचितीचा गट वाढेल.आपल्या कामात त्याच्या उपयोग करून घेऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल.आर्थिक लाभ होतील उसनवारी वसूल होईल. ेचांगल्या बातम्या ऐकण्यास मिळतील. मान सन्मानात वाढ होईल.चातुर्याने काम केल्यास आजचा दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. प्रवासातून लाभ होईल. मानसिक आरोग्य उत्तम राहिल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या