Friday, May 31, 2024
Homeभविष्यवेधआजचे राशी भविष्य 2 जानेवारी 2024 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 2 जानेवारी 2024 Today’s Horoscope

मेष –

सुरु केलेल्या कार्यात यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल.कामातील वाढी मुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. उपजीविकेच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न फळास येतील. धार्मिक वादात पडू नका. बोलण्यावर संयम ठेवा. तुमच्या कामामुळे विरोधक पराभूत होतील. राजनैतिक कामात सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जबाबदार्‍यांची पूर्तता होईल. भावाचा सल्ला प्रगतीचे कारण बनेल.

- Advertisement -

वृषभ –

विद्यार्थ्यांना ज्ञान व अनुभवाने नवीन संधी प्राप्त होतील. परीक्षेसाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. व्यापारासाठी अनुकूल काल आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. कौटुंबिक जीवन आनंदाचे असेल. पैसा, प्रतिष्ठा, पदात व्रुद्धि होइल. कार्यक्षेत्रात काम पूर्ण केल्याने परीक्षेसाठी केलेले प्रयत्न फळास येतील. प्रेम जीवनात व्यस्ततेमुळे काही काळासाठी दुरावा निर्माण होईल. आर्थिक प्रगती होईल. अनावश्यक खर्चांपासून वाचा.

मिथुन –

व्यापारातील सकारात्मक बदलाने लाभ मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी मेहनत करावी लागेल. भाऊ तसेच मित्रांचे सहकार्य मिळेल. तुमच्या पराक्रमात वृद्धी झाल्याने धन आणि ऐश्वर्य मिळेल. शत्रू जळतील. कौटुंबिक जीवन सुखमय असेल. सरकारी सत्तेचा संकेत आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील. विवाहासाठी योग्य स्थळांसाठी प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात जोडीदाराचे सल्ला फायदेशीर ठरेल.

कर्क –

कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु योग्यपणे समस्या हाताळण्यात यश मिळेल. बोलण्यावर खास लक्ष द्या. विध्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल पण रोख पैशांच्या बाबतीत काळजी वाढेल. विरोधक तुमच्या कार्याने प्रभावित होतील. कुटुंबासोबत मनोरंजनाचे क्षण अनुभवाल. कौटुंबिक नाती दृढ होतील. परंतु कुटुंबाच्या खर्चांकडे लक्ष द्या.

सिंह –

धार्मिक कार्यातील यशाने कीर्तीत वाढ होईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित चांगली बातमी मिळेल. व्यवसायात मनाजोगते काम मिळेल त्यामुळे मन प्रसन्न असेल. कौटुंबिक संपत्तीशी असलेला वाद नष्ट होईल. भावंड व मित्रांच्या सहाय्याने अडकलेली कामे पूर्ण होतील. कर्मचारी किंवा नातेवाईकांमुळे तणाव होऊ शकतो. रुपये-पैशांची देवाण-घेवाण करताना काळजी घ्या. सासरच्यांकडून लाभ होईल आणि गृहपोयोगी वास्तूमध्ये वाढ होईल. संध्याकाळच्या वेळी वाहनावर प्रयोग करताना काळजी घ्या.

कन्या –

कौटुंबिक स्थिती अनुकूल आहे आणि वडिलांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळेल. भावंडांच्या संबधात सुधारणा होईल. प्रेम जीवनात भेटवस्तू मिळेल. भाविष्यानुरूप कौशल्यांची निवड कराल. आर्थिक दृष्टीने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. बोलण्यातील सौम्यपणा प्रतिष्ठेत वाढ करेल. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरच्या खाण्या-पिण्यावर संयम ठेवा. जोडीदाराची साथ मिळेल.

तुळ –

कार्यक्षेत्रात सकारात्मक विचाराने नवउर्जेचा अनुभव घ्याल. अधिकारीवर्गाकडून कौतुक होईल. धर्मिक कार्यातील आवड वाढेल. सामाजिक काम केल्याने प्रतिष्ठेत वाढ होईल. मुलाच्या विवाहाची काळजी दूर होईल. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. व्यापारात मोठ्या व्यक्तीच्या समर्थनाने समस्येतून मुक्ती मिळेल. नव्या योजनांची सुरुवात करण्यासाठी भाग्याची साथ मिळेल. आर्थिक स्थिती अनुकूल आहे.

वृश्चिक –

प्रोजेक्ट पूर्ण करण्यात अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. रोजगारात बदल करण्यासाठी अनुकूल काळ नाही. नव जीवनात ताजेपणाचा अनुभव घ्याल. महिलेच्या मैत्रीमुळे प्रगतीची संधी मिळेल. मित्र व प्रियजनांसाठी अनावश्याक्खारच करावा लागू शकतो. रोजगारात यश मिळेल. जुन्या कर्जांपासून मुक्तता होईल. अनावश्यक देवाण-घेवाण करू नका. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल व त्यांच्या समस्या सोडवण्यात हातभार लागेल.

धनु –

व्यवसायात अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराच्या सल्ल्याने यश मिळेल.आर्थिक स्थिती मजबूत होईल. कार्यक्षेत्रात छुपे शत्रू व ईर्ष्या असणार्‍या साथीदारांपासून सावधान. भविष्य मजबुतीसाठी केलेल्या प्रयत्नांबाबत कुटुंबात विचार-विनिमय कराल. विवाहासंबंधी बातमी मिळेल. संध्याकाळच्या वेळी बाहेरच्या खाण्या-पिण्यावर संयम ठेवा. भांडण-तंट्यापासून लाभ रहा.

मकर –

कौटुंबिक समस्या नष्ट करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करा. पराक्रमाच्या आधारे अडकलेलीकामे पूर्ण करा.विद्यार्थ्यांना गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. कार्यक्षेत्रात सहकार्‍यामार्फत विश्वासघात होऊ शकतो. परंतु अधिकार्‍यांच्या मदतीने तुमची कामे पूर्ण होतील. प्रेम जीवनात भेटवस्तू व सहकार्य मिळण्याचा लाभ आहे. दुसर्यांचे सहकार्य घेण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक यात्रा सुखद व लाभदायक असेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ –

व्यावसायिक प्रतिभा विकसित करण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. प्रेम जीवनात ताजेपणा येईल. कुटुंबात गोंधळाचे वातावरण निर्माण होईल परंतु चर्चा केल्याने मतभेद दूर होतील. कार्यक्षेत्रात अधिकार्‍यांच्या सहकार्याने पद व प्रतिष्ठेत वाढ होईल. जुन्या मित्रांच्या भेटीचा योग संभवतो. राजनीतिक दिशेने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. सरकारी सत्तेचे सहाय्य मिळेल.

मीन –

अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी योग्य काळ आहे. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने काम करावे लागेल तेव्हाच यश मिळेल. आई-वडिलांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. प्रेम जीवनात गोडवा असेल आणि जुन्या वादांपासून मुक्ती मिळेल.व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात कोणतेही कार्य पूर्ण करण्याने तुमच्या स्वभावात्व वर्चस्वात वाढ होईल. कोर्ट-कचेरी प्रकरणात यश मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या