Tuesday, May 21, 2024
Homeभविष्यवेधआजचे राशी भविष्य 09 जानेवारी 2023 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 09 जानेवारी 2023 Today’s Horoscope

मेष –

सावधानीपूर्वक वाटचाल करावी. एखादया प्रकरणात निष्कारण गुंतले जाल. कुटुंबातील कलह वाढेल. जोडीदारासोबत सामंजस्यपूर्ण वागा. व्यापारात हानी होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी वाद-विवाद निर्माण होतील. अपराधी भावना वाढीस लागेल. व्यापारात हानी होण्याची शक्यता आहे. आईला अरिष्टकारक योग आहे. स्वतःची प्रकृती सांभाळा. अनिष्ट दिनमान आहे.

- Advertisement -

वृषभ –

आज मध्यम स्वरूपाचे दिनमान आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवा. विशेषत: महिला वर्गासोबत सौजन्यशील वागा. पत्नी व पुत्र यामुळे काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल. ललित कला व शिल्पशास्त्रांकरीता तसेच कला क्षेत्रातील व्यक्तीना दिवस चांगला आहे. प्रवासातून लाभ होतील. राजकीय क्षेत्रातील सरकारी क्षेत्रातील मंडळीना मोठी पदप्राप्ती आज होईल. भावडांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे.

मिथुन –

आज उत्तम दिवस आहे. धनस्थातील चंद्र भ्रमण अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण करेल. वाहन, घर, प्रॉपर्टी खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात, शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे. सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. आज नवनवीन प्रोजेक्टसाठी अनुकूल दिनमान राहील. मनात उत्साह राहील.

कर्क –

अत्यंत शुभ दिनमान असेल. स्वभाव, गुणवैशिष्टयामुळे पुरेपूर फायदा होईल. मोठी जबाबदारी पार पाडण्याची तयारी दर्शवाल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरीक्षेत यश देणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील. आपल्या वाणीचा इतरावर प्रभाव राहील. प्रगतीकारक दिनमान आहे. रागावर नियंत्रण ठेवा.

सिंह –

आजचा दिवस अनिष्ट आहे. व्ययस्थानातील आश्लेषा नक्षत्रातील भ्रमणामुळे एकटेपणा जाणवेल. स्वभावानुसार मानसिक चिडचिड, दगदग, होईल. वरिष्ठांबरोबर वाद-विवाद होतील. नोकरी बदल होण्याची संभावना आहे. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. वाईट संगत अंगलट येईल. मानसिक क्लेशातून, त्रासातून जावे लागणार आहे. अनैतिक कामापासून दूर राहा, अन्यथा कायद्याच्या कचाट्यात अडकाल. प्रकृतीकडे लक्ष दयावे.

कन्या –

आज बुधाचं स्वामित्व असणार्‍या नक्षत्रातून लाभ स्थानातून चंद्रभ्रमण होत आहे. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदाम्पत्यास आनंदाची बातमी मिळेल. मित्रमैत्रीण, नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. महत्वाची कामे तुम्हाला अपेक्षित असणार्‍या वेळेस पूर्ण होतील. अचानक धनलाभाची संधी मिळेल. शेअर मार्केट मध्ये फायदा होईल. यश निश्चित लाभेल. सातत्य ठेवा.

तुला –

आज कर्मस्थानांतील आश्लेषा नक्षत्रातील भ्रमण कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीना प्रगतीकारक आहे. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजित कामात वेग येणार आहे. नोकरी व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. शासकीय लाभ होतील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. घाईगडबडीमुळे अडचणी येण्याची शक्यता आहे. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. जुनी येणी वसूल होतील.

वृश्चिक –

आज भाग्यातील आश्लेषा चंद्र भ्रमण आपणास आर्थिक बाबतीत अनुकूल असणार आहे. योग्य नियोजन अचुक निर्णय यामुळे यश लाभेल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक आवक मनाप्रमाणे होईल. तीर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातून लाभ होईल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल. मन प्रसन्न राहील.

धनु –

आज अष्टमामातून आश्लेषा नक्षत्रातून होणार चंद्रभ्रमण जोडीदारासोबत, भावंडांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होतील. नातेवाईक मित्र-मंडळीबाबत दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. कोर्ट प्रकरणामुळे आपणास त्रास जाणवण्याची शक्यता आहे. नोकरीत काळजी चिंता निर्माण होईल व्यापारी वर्गांनी व्यवहार जपून करावेत. अन्यथा अडचणी वाढतील. आजाराकडे दुर्लक्ष करू नये. आज प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.

मकर –

आजचा दिवस शुभ लाभदायी असणार आहे. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. जुन्या मित्र-मंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. विद्यार्थी वर्गासाठी नक्षत्र अनुकूल आहे. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. धार्मिक कार्य घडतील. जोडीदारामध्ये स्नेह वाढेल. शुभ बातमी मिळेल. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील.

कुंभ –

आजचा दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. व्यापारात पत-प्रतिष्ठा सांभाळा. नोकरीत अनपेक्षित घटना घडतील. जुनी येणी, उधारी, वसुलीत व्यावसायिकांना खडतर परिस्थितीशी सामना करावा लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. जोडीदाराशी कटकटीचे वातावरण राहील. प्रकृतीबद्दल तक्रारी उद्भवतील. कुटुंबातील व्यक्तींवर शस्त्रक्रिया संभवते. डॉक्टर, औषधे यावर खर्च वाढेल. हाडांच्या दुखापती उद्भवतील. मानसिक स्वास्थ ठीक राहणार नाही.

मीन –

आज व्यवसाय करणार्‍यांना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. गुरुबल, पंचमातील चंद्रबल उत्तम आहे. धनप्राप्तीचा दिवस ठरणार आहे. या सुवर्णसंधीचा फायदा घ्या नोकरदारांच्या मनाप्रमाणे घटना घडतील. विद्यार्थी तसेच महिलांकरिता उत्तम दिवस आहे. राहू परदेश भ्रमणासाठी अनुकूल आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. जोडीदारांकडून सहकार्य लागेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या