Saturday, July 27, 2024
Homeभविष्यवेधआजचे राशी भविष्य 7 मार्च 2023 Today's Horoscope

आजचे राशी भविष्य 7 मार्च 2023 Today’s Horoscope

मेष –

तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा . तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालू शकतात. तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे. दिवास्वप्न पाहणे वाईट नाही. या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार मिळवू शकतात. असे तुम्ही आज करू शकतात कारण, तुमच्या जवळ वेळेचा अभाव नसेल.

- Advertisement -

वृषभ –

तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका. त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही, तुम्हाला धनसंचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संतसदृश माणसाला भेटून तुम्हाला मन:शांती मिळेल. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांना ही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर, गरज पडल्यास तुमच्या सोबत ही कुणीच नसेल. पत्नीकडून काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे. काम करण्याच्या आधी त्याच्या बाबतीत चांगले आणि वाईट विचार करू नका, स्वतःला एकाग्र करण्याचा विचार करा यामुळे सर्व काम चांगल्या प्रकारे होतील.

मिथून –

तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका. तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल – म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. जर तुम्ही आजचे काम उद्यावर ढकलत आहे तर, याचा तुम्हाला दुसर्‍या दिवशी वाईट परिणाम भोगावा लागू शकतो.

कर्क –

मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. पोस्टाने आलेले पत्र कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे/भागादाराकडे दुर्लक्ष केले तर तो किंवा ती नाराज होतील. सावधानतेने वाहन चालवले पाहिजे अथवा दुर्घटना होऊ शकते . तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल. लोकांमध्ये राहून सर्वांचा सन्मान करणे तुम्हाला माहित आहे म्हणून, तुम्ही सर्वांच्या नजरेत चांगली प्रतिमा बनवू शकतात.

सिंंह –

तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल, संयम सोडू नका. आपल्या वडिलांसोबत आज मित्रांप्रमाणे बोलू शकतात. तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होईल. तुमचा जोडीदार तुमच्यासाठी घरात काही सरप्राईझ डिश बनवू शकतो ज्यामुळे तुमच्या दिवसाचा थकवा निघून जाईल.

कन्या –

क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेण्याची घाई करु नका, आपल्या मुलांसाठी ते त्रासदायक ठरु शकते. जे लोक आत्तापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते आज त्यांना समजेल की, पैश्याची आयुष्यात किती आवश्यकता आहे कारण, आज अचानक तुम्हाला पैश्याची आवश्यकता असू शकते आणि तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल. जे आपली परिस्थिती समजू शकतात आणि गरज ओळखू शकतात अशा जवळच्या मित्राबरोबर बाहेर फिरायला जा. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.

तूळ –

तणावामुळे किंचित आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यातून विश्रांतीसाठी मित्रमंडळी, कुटूंबातील सदस्य यांच्यासोबत वेळ घालवा. आजच्या दिवशी चुकून ही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणार्‍याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत केव्हा करेल. तुमचा कुटूंबातील सदस्यांप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. आज तुमचा रिकामा वेळ ही ऑफिसचे काम पूर्ण करण्यात जाईल. तुमचे मित्र तुमच्या कामी येत नाही ही तक्रार आज तुम्हाला होऊ शकते.

वृश्चिक –

आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन स्नायू मोकळे करा. दिवसाची सुरवात जरी चांगली असली तरी, संद्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही चिंतीत व्हाल. कोणत्याही गोष्टींचा अंतिम निर्णय घेताना तुमच्या कुटूंबाचा त्याबाबत कौल घ्यावा. तुम्ही एकतर्फी निर्णय घेतलात तर तुम्ही अडचणीत सापडू शकाल. कुटुंबाला विश्वासात घेऊन संवाद साधून सर्वोत्तम निर्णय घेण्यात यशस्वी ठराल. तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही. आपला वेळ आईच्या सेवेमध्ये घालवण्याची इच्छा ठेवाल परंतु, ऐन वेळी कुठल्या कामाच्या येण्यामुळे असे होऊ शकणार नाही. यामुळे तुम्हाला समस्या होतील.

धनू –

दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करा. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे अश्या स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. टीव्ही वर सिनेमा पाहणे आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत गप्पा करणे, यापेक्षा उत्तम काय असू शकते? जर तुम्ही थोडा प्रयत्न केला तर, तुमचा दिवस काही याप्रकारे व्यतीत होईल.

मकर –

चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. कुणी ही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठले ही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. विना कुठल्या पूर्व सूचनेने आज तुमचा कुणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो ज्यामुळे तुमचा किमती वेळ त्यांची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो. आज तुम्हाला झाडाच्या सावलीमध्ये बसून आराम वाटेल. जीवनाला आज तुम्ही जवळीकतेने जाणून घ्याल.

कुंभ –

आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तीशी संवाद न झाल्यामुळे उदासवाणा दिवस. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल. त्यामुळे तुम्हाला दगदग होईल. परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. आपल्या लोकांची काळजी घेणे चांगली गोष्ट आहे परंतु, त्यांची काळजी घेता घेता आपले आरोग्य खराब करू नका.

मीन –

तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. . घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा करून आज तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकतात. शांततेचा वास तुमच्या मनामध्ये राहील आणि म्हणून, तुमच्या घरात ही उत्तम वातावरण ठेवण्यात यश मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या